—- पेठे मुक्तापूर येथील घटना
— 200 च्या वर नागरिकांना झाली पिण्याच्या पाण्यातून बाधा.
—- गेल्या पाच दिवसापासून दूषित पाण्याचा होत आहे पुरवठा.
—- दूषित पाणी पुरवठा झाल्यामुळे झाली लागण
— पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन लिकीज असल्यामुळे घडला प्रकार .
— गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य विभाग मुक्तापूरात.
—- ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष
—- नागरिकांच्या जीवाशी खेळ
—- सचिवाला या बाबत माहितीच नाही.
— जिल्हा आरोग्य समितीचे पदाधिकारी पोहचेल मुक्तापूरात.
नरखेड – अतुल दंढारे
नरखेड तालुक्यातील पेठ मुक्तापूर येथे गेल्या 5 दिवसानपासून दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य बिघडले असून त्यांना उलट्या व हगवणीचा त्रास होत असल्यामुळे जवळपास 200 नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून बाधा झाली असून जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत मुक्तापूर येथे दिवस रात्र आरोग्य कॅम्प सुरु असून गावात सुद्धा त्यांचयवर उपचार करण्यात येत आहे. पाच दिवसापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत नागरिकांनी ग्राम पंचायत कार्यालयाला कळवले असून त्यावर कसलीही उपाय योजना न करता उलट आताच पिण्याच्या पाण्याची टाकी साफ केली असल्याचे सांगण्यात आले.
जेव्हा गावातील नागरिकांची प्रकृती खराब व्हायला लागली ते जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आले असता त्यांच्यावर उचार करून आरोग्य कर्मचारी यांनी पेठ मुक्तापूर या गावात जाऊन पाण्याची तपासणी केली असता ते दूषित आढळून आले. आरोग्य कर्मचारी स्वतः गावात पाईप लाईन ची तपासणी केली असता त्यांना दोन ठिकाणी पाईप लाईन लीकेग असल्याचे आढळून आले.
या बाबत त्यांनी ग्राम पंचायत ला सांगितले असून पाईप लिन लाईन ची दुरुस्थी करण्यात आली असुंन गावातील पिण्याचा पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला असून. गावातील पूर्ण पाईप लाईनची तपासणी केली जात आहे. सोमवार पर्यंत जवळपास 200 नागरिकांना बाधा झाली असून अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे.
गावातील नागरिकांच्या जीवाशी खेळल्या जात असून कित्येक महिने पिण्याच्या पाण्याची टाकी साफ केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित दोषीन वर कार्यवाही करून त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अजब उत्तर
गावातील नागरिकांनी पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याला दूषीत येत असल्याचे सांगितले असता त्या कर्मचाऱ्यांने उलट उत्तर दिले. तो नागरिकांना म्हणाला कि तुम्ही लोक लग्नांमध्ये जेवायला बाहेर गावी जाता त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडत आहे असे उलट उत्तर त्याने नागरिकांना दिले.
आरोग्य विभागाच्या कार्याला सलाम
जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पेठ मुक्तापूर येथील ५ रुग्ण उपचारासाठी आले असता लगेच वैद्यकीय अधिकारी यांनी पेठ मुक्तापूर येथे आपले कर्मचारी पाठवून गावातील पाईप लाईन ची तपासणी केली व प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या आरोग्य बाबत विचारणा करून गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य कॅम्प सुरु केला असून आरोग्य कर्मचारी रात्र न दिवस नागरिकांची सेवा करत आहे.
सचिवाला परिस्थितीचे गांभीर्यच नाही.
पेठ मुक्तापूर येथे स्वेता खांडे या सचिव म्हणून कार्यरत आहे. त्यांना या दूषित पाणी पुरवठा होत असल्या बाबत विचारणा केली असता त्यांनी गावातील पाईप लाईन कुठेही फुटलेली नसल्याचे सांगितले तसेच त्या इतकी मोठी घटना होऊन सुद्धा मुख्यालयी नाही हि गंभीर बाब आहे. गावातील 200 च्यावर नागरिकांचे आरोग्य खराब झाले असताना याना या बाबत माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य समितीचे अधिकारी पोहचले पेठ मुक्तापूर ला
या घटनेची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी याना देण्यात आली असून त्यांनी लगेच जिल्हा आरोग्य समितीचे अधिकारी पेठ मुक्तापूर येथे पाठवले असून त्यांनी गावात जाऊन संपूर्ण चौकशी केली असून अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे.
पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरु असून नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकर द्वारे करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी पूर्ण घेण्यात येत आहे,
सेवक माकोडे सरपंच
पाईप लाईन मध्ये कुठेही बिघाड नसून सर्व पाइप लाईनची तासांनी तपासणी करण्यात आलेली आहे. ज्या विहिरीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो त्या विहिरीचे पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. तसेच गावकरांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर बोलावण्यात आले असून. पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत तपाणीसाठी पाठवण्यात आले आहे.
स्वेता खांडे
सचिव ग्राम पंचायत पेठ मुक्तापूर.
दूषित पाणी पुरवठा होत असल्याबाबत सचिव याना वेळोवेळी कळवले असता त्यांनी या ची दाखल घेतली नाही. वेळेची दाखल घेतली असती तर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला नसता. सचिव नेहमी मनमानी कारभार करत असतात.त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कडक कार्यवाही करून त्यांचे निलंबन करण्यात यावे.
निलेश ढोरे
नागरिक गट ग्राम पंचाय पेठ मुक्तापूर’
औषादांचा तुटवडा
पेठ मुक्तापूर येथील नागरिकाना पिण्याच्या पाण्यातून बाधा झाल्यामुळे २०० च्या वर नागरिकांची प्रकृती बिघडली असून त्याना जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले असत औषदांचा तुटवडा होता. त्यामुकले नरखेड व मोवाड येथुंन औषधी बोलवावी लागली असून तेथील हि औषधीचा तुटवडा होता. नेहमीच जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधीचा तुटवडा असतो हे विशेष.