सांगली – ज्योती मोरे.
हृदयविकार आणि फुफुसांच्या अति गंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी, पुणे यांनी सांगलीतील ब्रिदवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मिरज व सांगली श्वास लाईफलाईन सेंटर, इंदिरानगर,सांगली. वेध डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर,एसटी स्टँड जवळ, सांगली.आणि क्रांती कार्डियाक सेंटर, सांगली. या चार ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरू होत आहे.
या सुविधेमुळे तज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन मिळणे शक्य होईल. या ओपीडी द्वारे अवलंबून किंवा अतिगंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर काही वेळा प्रत्यारोपण सुद्धा करावे लागतात त्याकरिता महाराष्ट्रातील रुग्णांना हैदराबाद, चेन्नई मध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
परंतु, पुण्यातील डीपीयू हॉस्पिटलमध्ये आता या प्रत्यारोपणाच्या सर्व सेवा सुविधा,अनुभवी कुशल डॉक्टर टीम उपलब्ध असल्याने वेळ व पैशाची बचत देखील होईल त्यामुळे सांगली परिसरातील रुग्णांना लाभ होणार असल्याची माहिती डॉक्टर संजय पठारे यांनी हॉटेल स्काय अवेन्यू मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
या पत्रकार परिषदेला डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर ऑपरेशन्स डॉक्टर संजय पाठारे यांनी संबोधित केले. यावेळी ह्रदय शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुराग गर्ग, श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉक्टर एम. एस. बरथवाल,हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशील कुमार मुलानी, तसेच हृदय शल्यचिकित्सक डॉ. रणजीत पवार,
फुफुस प्रत्यारोपण व श्वसन विकार तज्ञ डॉ.राहुल केंद्रे, हृदयरोग तज्ञ डॉ. अजित जाधव आणि ब्रिदवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.पृथ्वीराज मेथे व श्वास लाईफलाईन सेंटरचे डॉ.अनिल मडके,वेध डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरच्या डॉ. जयश्री पाटील क्रांती कार्डियाक सेंटरचे डॉ. आशिष मगदूम उपस्थित होते.