अमरावती – सुनील भोळे
अमरावती व बडनेरा महानरपालिका क्षेत्रात शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांचे सर्वेक्षण आज दिनांक ५ जुलै २०२४ ते २० जुलै २०२४ या काळात करण्यात येत आहे.शालाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणाचा शुभारंभ आज ५ जुलै २०२४ रोजी मोठ्या जोमाने करण्यात आला.
अमरावती मनपा शिक्षण विभागाने मा.आयुक्त श्री.सचिन कलंत्रे ,मनपा उपायुक्त श्री. नरेंद्र वानखेडे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे तसेच मनपा शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम यांच्या नेतत्वाखाली आज दिनांक ५ जुलै २०२४ ला राजकमल चौक स्थित नेहरू मैदान येथे सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी नेहरू मैदानातील पारधी समाज बांधवांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. येथील लोकांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री.सचिन कलंत्रे यांना शिक्षणाविषयी आपल्या पाल्यांच्या समस्या सांगितल्या.
याप्रसंगी या विद्यार्थ्यांचे शिक्षण योग्य प्रकारे होण्यासाठी या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.अश्याच प्रकारचे सर्वेक्षण अमरावती व बडनेरा मनपा क्षेत्रात दिनांक ५ जुलै ते 20 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण विभाग अमरावती ची टीम तसेच सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचे शिक्षक करणार आहेत. हे सर्वेक्षण वीटभट्टी परिसर, छत्री तलाव परिसर, नवसारी, धर्म काटा परिसर, गांधी आश्रम, रेल्वे स्टेशन, विविध बांधकामे, सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, बस स्टेशन इत्यादी ठिकाणी करण्यात येणार आहे.
मनपा क्षेत्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.याप्रसंगी अमरावती मनपा उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे, सिस्टीम मॅनेजर श्री अमित डेंगरे, समग्र शिक्षा चे कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, शाळा निरीक्षक ज्योती बनसोड, संध्या वासनिक, क्रीडा निरीक्षक प्रवीण ठाकरे, शाळाबाह्य सर्वेक्षण समन्वयक सुषमा दुधे, धीरज सावरकर, योगेश राणे, संजय बेलसरे, निजामुद्दीन काझी, शुभांगी सुने, दिपाली थोरात तसेच सर्व विशेष शिक्षक, केंद्र समन्वयक व केंद्रातील मुख्याध्यापक उपस्थित होते.