मुंबई – गणेश तळेकर
दादर विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय, टायकल वाडी ,माहीम, माटुंगा रोड, पश्चिम मध्ये कॉमर्स 11वी, ला प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जरी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केली नसेल तरी ती करून घेतली जाईल. कमीतकमी 35% गुण आवश्यक. अनुभवी शिक्षक,तसेच अद्ययावत e learning, माफक फी, रेल्वे कन्सेशन यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे ,या हेतूने सुरू झालेली ही शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, म्हणजे मूळची ओरिएंटल हाय स्कूल ,म्हणजेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शाळा आहे. गोरगरिबांसाठी सुरू असलेली शाळा व कनिष्ठ महाविद्यालय टिकणे ही काळाची गरज आहे. तरी आपल्या परिसरातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे यासाठी आपण प्रयत्न करूया.
याचसाठी या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश वाढवण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा. आपली संघटना नेहमीच 80%समाजकारण व 20% राजकारण करत आली आहे. याचाच भाग म्हणून आपण सर्व प्रयत्न करूया ही विनंती.
आपलीच,
सौ.अनुश्री अतूल घोगळे, शिक्षक संघटना,महीला आघाडी – अध्यक्ष.
मो. 9773083868
आपला शालेय विद्यार्थी – गणेश तळेकर,
मो:- 9224703181.