OSCARS95 : या वर्षी द एलिफंट व्हिस्पर्स, भारताने 95 व्या अकादमी अवॉर्ड्समध्ये शॉर्ट डॉक्युमेंटरी श्रेणीमध्ये नामांकन केले होते, ज्यामध्ये चित्रपटाने बाजी मारत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
95 व्या अकादमी पुरस्कारांना सुरुवात झाली आहे. यावेळचा ऑस्कर पुरस्कार भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ हे गाणे ऑस्कर 2023 च्या ओरिजिनल गाण्याच्या प्रकारात स्पर्धेत उतरले आहे. ‘ऑल द ब्रेथ्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन शौनक सेन यांनी केले आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी नामांकन मिळाले असून त्याचे दिग्दर्शक कार्तिक गोन्साल्विस आहेत.
इतकंच नाही तर ऑस्कर सोहळ्यात दीपिका पदुकोण प्रेझेंटर म्हणूनही उपस्थित राहणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा भारताच्या सहभागाकडे लागल्या आहेत. एवढेच नाही तर यावेळी ऑस्कर शोचा होस्ट सुप्रसिद्ध कॉमेडियन जिमी किमेल आहे. #OSCARS95 सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. पण ऑल दॅट ब्रीद्स ऑस्कर जिंकण्यात अपयशी ठरला आहे.