हेमंत जाधव
वैदर्भीय नाथ समाज संघ ही आपल्या नाथ समाजातिल पहिली संघटना आहे ज्या संघटनेला नाथ समाजाच्या मुलभुत समस्या मार्गी लावण्याकरीता मंत्रालयात प्रशासकिय अधिकारी तथा संबधीत मंत्री यांच्या दालनात बैठकीकरीता बोलविण्यात आले. बरोबरच बऱ्याच समस्या मार्गीसुध्दा लागल्या. नाथ समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ठ करण्यासाठी अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर करोणा काळात सुध्दा भव्य मोर्चा काढूण प्रसंगी कार्यकर्त्यांनी अंगावर गुन्हे सुध्दा ओढवून घेतले.
मागील वर्षी २९ मे २०२२ रोजी कारंजा लाड येथे राज्यस्तरीय नाथ समाज मेळावा पार पडला आणि विषेश म्हणजे तो एक समाजाभिमुख मेळावा होता. ज्यामध्ये महाराष्ट्रराज्याचे एन.टी.बी. विभागाचे तत्कालीन राज्यमंत्री आपल्याला उद्घाटक म्हणुन उपलब्ध झाले होते. एवढेच नाही तर त्यांचे मार्फत समाजाचे बरेचसे प्रश्न जसे की घरकुल, जातीचा दाखला, अतिक्रमीत जागा नियमाकुल करणे, व आपल्या काही मागण्या त्यांनी मुख्यमंत्री मोहदयाकडे सुध्दा मांडल्या आणि त्यावर लवकरच अमलबजावणी सुध्दा होईलच तसा पाठपुरावा संघटनेकडुन सुरू आहेच.
त्या अर्थाने समाज मेळाव्याची एक वेगळी व्याख्या समाजासमोर मांडली. त्याच प्रमाणे ह्यावर्षी सुध्दा सक्षम तसेच नाथ समाजाप्रती सकारात्मक दृष्टी आणी विचार असलेल्या राजकीय प्रस्थांच्या आणि नाथ समाजातील जेष्ठांच्या उपस्थितीमध्ये वैदर्भीय नाथ समाज संघ संलग्नीत गोरक्षनाथ मंदिर समिती पुंडा च्या वतीने पुंडा ता. अकोट जि. अकोला येथे रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी भव्य विदर्भ स्तरीय नाथ समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे.
ज्यामध्ये सामाजिक सलोखा, शासनदरबारी प्रलंबीत असलेल्या नाथ समाजाच्या विषयावर उपस्थित राजकीय प्रतिनीधींकडे पाठपुरावा करणे, वधु-वरांची माहिती संकलीत करणे, जातीच्या दाखल्याबाबत शासनाच्या 2001 च्या परिपत्रकाचे वितरण तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अर्जांचे वितरण सदर मेळाव्याचे ठिकाणी होणार आहे.
मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार श्री अमोलदादा मिटकरी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी महिला व बालविकास मंत्री माननीय आमदार श्रीमती यशोमतीताई ठाकुर ह्या असतील. करीता, मागील मेळाव्याला नाथसमाजाने आवर्जुन दिलेली सन्माननिय उपस्थिती याही वेळेस सहकुंटुब द्यावी असे आवाहन वैदर्भीय नाथ समाज संघाच्या वतीने करण्यात आले आहे.