Friday, November 22, 2024
Homeराज्यनगरधनच्या मंडईत आमदंगल, प्रबोधन व मनोरंजन - नगरधन ग्रामपंचायत व नगरधनवासी यांच्या...

नगरधनच्या मंडईत आमदंगल, प्रबोधन व मनोरंजन – नगरधन ग्रामपंचायत व नगरधनवासी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन…

आमदंगलीत रंगविला पहेलवनांनी डाव, सत्यपाल महाराजांनी केले प्रबोधन, नाटक,दंडार,तमाशा, कव्वाली,लावणी, डान्स हंगामाने केले मनोरंजन.

रामटेक – राजु कापसे

ग्रामपंचायत नगरधन व नगरधनवासी यांच्या संयुक्त विद्यमाने आंमदंगल व मंडई उत्सवाचे नगरधन येथे कार्तिक पौर्णिमा,पंचमीच्या शुभपर्वावर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहेलवनांनी,नाटक,दंडार,तमाशा या लोककला सादरकर्ते तसेच प्रबोधनात्मक कीर्तनकार व डान्स हंगामा सादर करणारे कलावंत इत्यादींनी मंडई उत्सवात उत्साह व आनंद निर्माण केला.
29 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजतापासून आमदंगल सुरू झाली.सुरुवातीला छोट्या कुस्त्या खेळविल्या गेल्या.

त्यानंतर वजनगटातील कुस्त्यांना सुरुवात झाली.तसेच ओपन गटातील कुस्त्यासुद्धा झाल्या.आमदंगलीत दूरदुरचे पुरुष व महिला पहेलवान सहभागी झाले होते.ओपन गटातील पुरुषांच्या कुस्ती सामन्यात नीलेश दमाहे विजेता तर संजय मोहारे उपविजेता ठरले.महिलांच्या ओपन गटातील कुस्ती सामन्यात कल्याणी मोहारे ही विजेता तर कोमल वानखेडे(नागपूर)ही उपविजेता ठरली.विविध वजन गटातील कुस्त्यांतील सामन्यातील विजेता,उपविजेता,वजन गटातील विजेते खेळाडुंना रोख रकमेसह आकर्षक पुरस्कार देण्यात आले.

२९ ऑक्टोबरलाच रात्री 9 वाजता मधुकर लिल्हारे व त्यांच्या चमूने ‘खून मांगे बटवारा उर्फ अर्थी और बारात’ ही नऊअंकी नाटक सादर केली. त्याच दिवशी रात्री राजीव नगर टोलीवर शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे विरुद्ध पुरुषोत्तम खांडेकर यांचा दुय्यम खडा तमाशा झाला.

30 ऑक्टोबरला सकाळी 10 ते रात्री 8 वाजता पर्यंत लताकिरण,नागपूर विरुद्ध भीमेश भारती,काटोल यांचं ‘दुय्यम कव्वाली’ चा कार्यक्रम झाला.त्याच दिवशी रात्री 9 ते 11 सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम साईबाबा राईसमिलच्या पटांगणावर झाला.

31 ऑक्टोबरला सकाळी 12 ते रात्री 8 पर्यंत अरोली येथील शाहीर केशव नारनवरे यांचा राष्ट्रीय संगीत खडा तमाशाचा कार्यक्रम तर रात्री 9 वाजतापासून ‘शुकाची चांदणी लावणी व डान्स हंगामा ग्रुप’,वडसा यांचा डान्स हंगामाचा कार्यक्रम नगरधन ग्रामपंचायतच्या पटांगणातील मंचावर झाला.यावर्षी हमलापुरी येथील फक्त एकच दंडार मंडईत आली होती.

त्यांनी आपल्या पोवाडा व नृत्यकलाकाराच्या माध्यमातून सर्वांचे भरपूर मनोरंजन केले.नाटक,दंडार,तमाशा,डान्स हंगामा,कीर्तन, कव्वाली सादर करणाऱ्यांना ग्रामपंचायत व गावातील विविध आयोजक,व्यापारी मंडळींकडून रोख रक्कम बक्षीसाच्या रुपात देण्यात आली.तीन दिवसीय या आमदंगल व मंडईच्या कार्यक्रमाला खासदार कृपालजी तुमाने,आमदार आशिष जयस्वाल,माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी,पं.स.रामटेकचे माजी उपसभापती उदयसिंह(गज्जु)यादव,

पर्यटक मित्र चंद्रापालजी चौकसे,प्रहार संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष श्री .रमेशजी कारेमोरे,रामटेक पं.स.सदस्य सौ.अस्विता मुन्नीलाल बिरणवार,माजी.जि.प.सदस्य श्री नरेशजी धोपटे,माजी पं.स.सदस्य भूषण(शंकर)होलगिरे,दयारामजी भोयर, समाजसेवक अभियंता श्रीरामजी कावळे,अँडव्होकेट,ओमप्रकाश मसुरके,डॉ.आशिष कामडी इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा भेट देऊन आर्थिक सहकार्य केले.

तीनदिवसीय मंडई उत्सवाच्या कार्यक्रमाच्या आयोजनात नगरधन ग्रामपंचायतचे सरपंच श्री.प्रशांतजी कामडी,उपसरपंच अनिलजी मुटकुरे,ग्रामविकास अधिकारी नारायणजी कुंभलकर,ग्रामपंचायत सदस्य श्री.चंद्रकांत(पिंटू)नंदनवार, निर्मलाताई हिवारे,शिवरामजी रामेलवार,नीलेशजी मेश्राम,गोपालजी राऊत,प्रकाशजी लांबट,सागरजी धुर्वे,ज्योतीताई शेंडे,अरुणाताई पाचे,रूपाताई अजबैले,वंदनाताई बिरणवार,

वाघमारे,निर्मला कामडी,इंदिरा सरोदे,मंगला लिल्हारे,नगरधन ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी,कुस्तींचे सर्व पंच,उदयसिंह यादव व मित्र परिवार,प्राचार्य दीपकजी मोहोड व मित्रपरिवार,मोनू ठाकूर व मित्र परिवार,कामगार नेता अशोक गंगबोर,सचिन खागर,बलराज चौहान,भूषण कडुकर,सोमेश्वर दमाहे,डॉ.पवन कामडी,स्नेहदीप वाघमारे,रवींद्र शेळके यांसह गावतील सर्व डॉक्टर,व्यापारी,दुकानदार व नगरधनवासी इत्यादींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: