सांगली – ज्योती मोरे
सांगलीतील नेमिनाथ नगर मध्ये कल्पदुम ग्राउंड वर सुरू असलेल्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याअंतर्गत आज सकाळी दहा वाजता महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
श्री गणरायाचे नामस्मरण करून सदर शिबिरास सुरुवात करण्यात आली. सांगलीतील सिद्धिविनायक ब्लड बँकेने हे रक्त संकलित केले.जास्तीत जास्त सांगलीकर आणि रक्तदान करावे असे आवाहन संयोजक हार्दिक सारडा यांनी केले. सदर शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्याअंतर्गत श्री राम कथा हरिपाठ कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होत असताना सामाजिक भान राखून, सोहळा समितीने आरोग्य शिबिराचेही आयोजन केले असून, या शिबिरातील रक्तदान हा तिसरा कार्यक्रम आहे.उद्या विवेकानंद हॉस्पिटलचे डॉक्टर राम लाडे यांच्या सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.