- पुर्व पेंच व्याघ्र प्रकल्पातर्फे पत्रकारांच्या दौऱ्याचे आयोजन
- जंगलासह वन्य प्राण्यांच्या सुरक्षा व संवर्धनाची दिली माहिती
रामटेक – राजू कापसे
जंगलांसह वन्य प्राण्यांच्या सुरक्षा व संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत सर्वोतोपरी प्रयत्न करीत असतात व त्या माध्यमातून जंगलाला व वन्यप्राण्यांना सुरक्षा प्रदान करून त्यांचे संवर्धन केले जाते असे असले तरी मात्र शासन खर्च करीत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीमध्ये वन विभाग प्रशासन अखेर करते तरी काय हा प्रश्न सर्वसामान्यांसह विशेषता पत्रकारांच्या डोक्यात घुसमडत राहायचा तेव्हा हीच बाब हेरून वन विभाग प्रशासनाने नुकतेच 6 ऑक्टोबरला पत्रकारांचा दौरा या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.
यादरम्यान पत्रकारांना जंगल सफारीद्वारे जंगलाचा फेरफटका मारून जंगलामध्ये ठिकठिकाणी वन्य प्राण्यांच्या सोयी सुविधेसाठी तथा जंगलाच्या व वन्य प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय उपाय योजना राबविल्या जातात याबाबत रामटेक तालुक्यातील स्थानिक पत्रकारांना पूर्व पेंच चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री मंगेश ताटे यांनी माहिती प्रदान केली.
दिनांक सहा ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता दरम्यान तालुक्यातील पत्रकारांना पूर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अमलतास येथे एकत्रित होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले होते दरम्यान प्रारंभी सकाळी साडेआठ वाजता दरम्यान अमलतास येथील मीटिंग सभागृहामध्ये समस्त पत्रकारांची बैठक घेण्यात आली येथे आर.एफ.ओ. ताटे यांनी चलचित्रद्वारे जंगल व जंगलातील वन्य प्राण्यांची जीवन जगण्याची जीवनशैली याबाबत माहिती दिली.
तसेच जंगलातील वन्य प्राण्यांसाठी असलेले पानवठे तसेच त्यांचे खाद्य याबाबतही यावेळी चलचित्राद्वारे उपस्थित पत्रकारांना माहिती देण्यात आली. यानंतर अमलतास येथीलच दुसऱ्या एका सभागृहामध्ये वाघाचे व त्यांच्या पिलांचे संघर्षमय जीवन, वाघिणीचे पिलांना संरक्षण व शिकारीबाबदचे प्रशिक्षण, वाघाची पिल्ले मोठे झाल्यावर त्यांचे संघर्षमय जीवन कसे असते या सर्व बाबींबाबत आर.एफ.ओ. ताटे यांनी यावेळी माहिती दिली.
यानंतर वन विभागाच्या वाहनांमध्ये पत्रकारांनी आर एफ ओ मंगेश ताटे यांचे सोबत पुर्व पेंच व्याघ्र प्रकल्पात आगेकूच केली. यादरम्यान रानगवे, मोर, हरीण यांचेसह विविध पशुपक्षी दिसुन आले, या प्राण्यांच्या जिवनशैलीबाबददी यावेळी माहिती देण्यात आली.
यावेळी पुर्व पेंच चे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांचेसह वनरक्षक गणपत मुंडे, पत्रकारद्वय पंकज बावनकर,जगदीश सांगोडे, राजू कापसे, पंकज मासूरकर , मुकेश तिवारी, अनिल वाघमारे, पंकज चौधरी, हर्षपाल मेश्राम, राहुल पेठकर, नत्थु घरजाळे, राहुल पिपरोदे, त्रिलोक मेहर, मोईन पठाण, महेंद्र दिवटे, उमेश फुलबेल, राजु आग्रे, पुरुषोत्तम डडमल, शुभम कामळे, देवराव धुर्वे, रितेश बिरणवार, रज्जु हरणे, ललित कनोजे आदींची उपस्थिती होती.