रामटेक – राजु कापसे
अलीकडच्या काळात जंगलाशेजारील गावात वाघांचा व जंगली प्राण्यांचा वावर वाढल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील रामटेक व इतर वनक्षेत्रात जंगलात चरायला गेलेल्या पाळीव जनावरांसह गुराखी, शेतकरी, आदिवासी यांच्यावर हल्ले झाले आहेत. हे लक्षात घेता जंगलाचे बफर शेत्रातील गुराखी करीता अमलातास पर्यटक संकुल येथे कार्यशाळेचे आयोजन ( दि १०) गुरुवार रोजी करण्यात आले.
यामध्ये २५ बफर गावातील १२३ गुराखी लोकनी सहभाग घेतला.कार्यक्रमचे प्रास्तविक मधे जयेश तायडे वनपरिशेत्र अधिकारी पवनी ए.नि.यांनी काही दिवसापुर्वी पेंच बफर व प्रादेशिक शेत्रात वाघांनी केलेल्या हल्ल्यामुळे काही लोकांचा मुत्यु झालेला असून त्यापैकी जास्त लोक हे गुराखी होते असे सांगितले.
त्यामुळे गुराखी याच्यामधे जागरुकता होणे आवश्यक असून त्यातून स्वरक्षण व गावातील लोकांचे रक्षण या करिता गुराखी मोलाची भूमिका पार पडुन वनविभागाला मदत करू शकता अशी भावना व्यक्त केली .सदर वेळी बनियान ट्री फाउंडेशन चे संचालक श्री मंदार सलाये हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमा मधे श्री संजय करकरे प्रोजेक्ट इंचार्ज बनियान ट्री फाउंडेशन यांनी ppt च्या माध्यमातुन गुराखी यांनी काय काळजी घ्यावी,काय करावे,कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी गुराखी यांनी त्याच्या अडचणी सांगितल्या .त्याबाबत सुद्धा त्त्याना मार्गदर्शन करण्यात आले.
गुराख्याना यावेळी टीशर्ट ,मुखवटे व त्यानी घ्यावयाची काळजी याचे पत्रक असे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन हे डॉ प्रभुनाथ शुक्ला उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प व कू पूजा लिंबगांवकर याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.