रामटेक – राजु कापसे
रामटेक उपजिल्हा रुग्णालय येथे दि. १६/०९/२०२३ ला आयुष्यमान भव मोहिमेअंर्तगत भव्य आरोग्य आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरात प्रमुख उद्घाटक म्हणून रामटेक विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार आशिष जयस्वाल तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा मुक्ता कोकुर्डे जिल्हा परिषद, नागपूर प्रमुख अतीथी मा. डॉ. कांचन बानेरे उपसंचालक नागपूर,
डॉ. निवृत्ती राठोड जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर, मा. नरेंद्र बंधाते पंचायत समिती सभापती श्री. विनोद चरपे गट विकास अधिकारी, श्री. सतिश डोंगरे जिल्हा परिषद सदस्य श्री. दुधराम सव्वालाखे जिल्हा परिषद सदस्य, श्रीमती शांताताई कुंभरे जिल्हा परिषद सदस्य, डॉ. अजय डबले जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. काकडे मॅडम तालुका आरोग्य अधिकारी,
श्री. दौलतकर सहा.सल्लागार, समाजल्याण जिल्हा परिषद, नागपूर श्री.विवेक झाडे विशेष तज्ञ,श्रीमती कनोजे विशेष तज्ञ पंचायत समिती रामटेक श्री.पंकज पांडे मुख्याध्यापक स्नेहसदन दिव्यांग शाळा शितलवाडी, श्री.विलास फटींग मुख्याध्यापक, एकविरा मतिमंद मुलाचें बालगृह श्री. तुलसीराम जुनघरे,शाळा प्रमुख, सुरज दिव्यांग मुलाचीं शाळा काचुरवाही व श्री.नगरकर, शाळा प्रमुख,मुक बधिर विद्यालय शितलवाडी, रामटेक या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयुष्यमान भव शिविर पार पडले.
दिव्यांग मध्ये ३१७ रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच आयुष्यमान भव शिबिरामध्ये ८६२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. व त्यामधून शस्त्रक्रियेकरीता २८ लाभार्थ्याची नोंदणी करण्यात आली व ३२ रुग्णांना इतर आजारा करीता संदर्भ सेवा देण्यात आली. मा. आमदार साहेबांनी १०० टक्के लाभार्थीनी आयुष्यमान भारत योजने अंर्तगत नोंदणी व दिव्यांगाची दिव्यांग प्रमाणपत्र करण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी असे मार्गदर्शन केले.
मा. मुक्ताताई कोकुर्डे जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी सुचविले की, सर्व गरजू व गरीब रुग्णांना शासनाच्या सर्व आरोग्य योजनेच्या लाभ मिळावा असे सांगितले. शिबिराच्या यशस्वीते करीता सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याचे, दिव्यांग शाळा व समग्र शिक्षा विभाग पंचायत समिती रामटेक यांचे सहकार्य लाभले.