Monday, December 23, 2024
Homeराज्यआलापल्ली येथे अस्थीरोगाच्या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन…

आलापल्ली येथे अस्थीरोगाच्या भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन…

अहेरी – आलापल्ली वनविभागा अंतर्गत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर संकल्पनेतून व पुनम पाटे उपवनसंरक्षक आलापल्ली तसेच राहुल सिंह टोलिया उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नागरिक, वनकामगार व वनविभागातील अधिकार व कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्य यांच्या करीता अस्थीरोगा बाबत नागपूर शहरातील नामांकित रूग्णालय ग्रेस आर्थोकेअर मल्टीस्पेशालिटी रूग्णालय नागपूर येथील नामांकित अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निनांद गोडघाटे व डॉ.नेहा गोडघाटे यांचे अस्थीरोगाचे आरोग्य शिबीर दिनांक 7/5/2023 ला प्राथमिक आरोग्य केंद्र आलापल्ली येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिराचे आयोजन आलापल्ली वनविभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अहेरी व ग्रामपंचायत कार्यालय आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर मेश्राम सरपंच आलापल्ली, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर लाडस्कर, डॉक्टर राजेश मानकर डॉक्टर अलका उईके वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी उपस्थित होते.

आरोग्य शिबीरामध्ये डाॅक्टर निनांद गोडघाटे व डॉक्टर नेहा गोडघाटे यांनी आलापल्ली परिसरातील ग्रामस्थ ,वनविभागाचे मजुर व कर्मचारी अश्या 197 लोकांची अस्थिरोगाची तपासणी केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, भारती राऊत, प्रमोद जेनेकर, भावना अलोने, ललित रामटेके क्षेत्र सहाय्यक पुनमचंद बुध्दावार, प्रकाश राजुरकर,राजेश पिंपळकर,रूषी तावाडे वनरक्षक दामोधर चिव्हाने, सचिन जांभूळे,

महेश खोब्रागडे, रूपेश तर्रेवार, खैरे,वासेकर, वनमजूर बंडु रामगीरीवार,वहन चालक मोहम्मद इस्माईल, सचिन डांगरे व जंगल सहकार संस्थेच्या चोकीदारांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पिंपळकर तर आभार पुनमचंद बुध्दावार यांनी मानले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: