बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे व एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल खामगांवने नुकताच आपला ७ वा वर्धापन दिन साजरा करुन ८ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
२४ तास निरंतर अत्यावश्यक सेवा व एमडी डॉक्टर्स ची उपलब्धता, सिटी स्कॅन व एमआरआय सह इतर अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज, प्रशिक्षित नर्सीग स्टाफ, आरोग्यदायी वातावरण, स्वच्छता व मनमिळावू कर्मचारी वृंद यामुळे सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल काही दिवसातच रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसाठी पहिल्या पसंतीचे उपचार केंद्र म्हणून नावारुपास आले आहे.
रविवार दि. १६ एप्रिल २०२३ रोजी ७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुपरस्पेशालिटी व मल्टीस्पेशालिटी मोफत रोगनिदान शिबिराचे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सिल्व्हरसिटी हॉस्पिटलचे आवारात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अकोला येथील न्युरो सर्जन डॉ. नरेंद्र भागवत व डॉ. अखिलेश अग्रवाल, मेंदु विकार तज्ञ न्युरोलॉजीस्ट डॉ. अक्षय लखोटिया, डॉ. अभय बागुल, डॉ. अपेक्षा मालवीया, किडणी रोग तज्ञ डॉ. निखील किबे व डॉ. प्रशांत मालवीया, युरोलॉजीस्ट व किडणी स्टोन तज्ञ डॉ. जयदीप महाजनी व डॉ. आनंद शर्मा,
हृदयरोग तज्ञ डॉ. दिपक नेनवाणी, प्लास्टीक सर्जरी तज्ञ डॉ. हेमंत मानकर, सौंदर्य व चर्मरोग तज्ञ डॉ. प्रतिक मोहता व डॉ. इशा मोहता, अस्थिरोग व कृत्रिम सांधेरोपण तज्ञ डॉ. समिर देशमुख, लिव्हर व पोटाचे विकार तज्ञ डॉ. परमेश्वर जुनारे तसेच सिल्व्हरसिटी हॉस्पिटलमधील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांचा सहभाग असणार आहे. शिबिरात येतांना रुग्णांनी उपचारासंबंधीत आपल्या जुन्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून तज्ञ डॉक्टरांव्दारे तपासणी करुन घ्यावी.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा व नांव नोंदणीसाठी रुग्णांनी ९१४६१८५६१२ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन सिल्व्हरसिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अशोक बावस्कर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग महाजन व सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव लठ्ठा व संचालक मंडळाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.