कोल्हापूर – राजेंद्र ढाले
कोल्हापूर फौंड्री व इंजिनियरिंग क्लस्टर संचलित सेंटर ऑफ एक्सलंस, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर येथे दिनांक २४/१२/२०२२ रोजी डॉक्टर जगत शहा यांचे कोल्हापूरातील निर्यात संबंधीत औद्योगिक व्यवसाय व व्यापार कसा वाढवावा यासाठी सवांद व चर्चासत्र आयोजित केले आहे. कोल्हापूरात प्रथमच अश्या कार्यक्रमाचे आयोजन सेंटर ऑफ एक्सलंस मध्ये होत आहे.
या अद्वितीय चर्चासत्रा साठी ग्लोबल नेटवर्क इंडिया आणि व्हायब्रण्ट मार्केट्स चे संस्थापक सीइओ व व्हायब्रण्ट गुजरात चे जनक श्री. डॉक्टर जगत शहा हे व्यवसाय वाढीसाठी जागतिक बाजारपेठेचा शोध या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
डॉक्टर जगत शहा यांनी जवळपास ४० देशांसोबत विविध निर्यात सेवा व उत्पादने या विषयावर काम केले आहे. डॉक्टर जगत शहा ICMCI USA प्रमाणित व्यवस्थापन सल्लागार आहेत व भारतीय डायमंड इन्स्टिटयूट मधून डायमंड तंत्रज्ञान मध्ये पदवी मिळवली आहे. त्यांनी वेगवेगळे क्लस्टर फॉर्मेशन आणि गरिबी निर्मूलन अश्या क्षेत्रात हि काम केले आहे.
सेंटर ऑफ एक्सलन्स हे आंतरराष्ट्रीय बिझनेस सपोर्ट हब अंतर्गत निर्यात क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी व साहाय्य देणेसाठी इकोसिस्टिम निर्माण करीत आहेत त्या अनुशंघानेच हे चर्चा सत्र आयोजीत केले आहे. तसेच निर्यात क्षेत्रात लागणारे कायदेशीर साहाय्य, आंतराष्ट्रीय बाजारांबद्दल माहिती, व आव्हाने काय आहेत तसेच त्यावरील उपाय ह्याबद्दल सुद्धा या कार्यक्रम माहिती दिली जाईल.
१३ ते १८ जानेवारी २०२३ या कालावधीत निर्यात क्षेत्राशी निगडित १). निर्यात न करणाऱ्यांसाठी निर्यात बाजारपेठेत कसा प्रवेश करावा, २). १० कोटी पर्यंत निर्यात संबंधीत आर्थिक उलाढाल असलेल्यानासाठी त्यात वाढ कशी करावी व ३). १० कोटी पेक्षा जास्त निर्यात संबंधीत आर्थिक उलाढाल असलेल्यानसाठी २ वर्षात ती दुप्पट कशी करावी यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.