सांगली – ज्योती मोरे
कुपवाड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सुरज फाउंडेशन व सांगली जिल्हा केबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये वयोगट 11, 13, 15, 17 व 19 मुले मुली तसेच खुला गट पुरुष व महिला पहिली महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुपवाड एमआयडीसी येथे केले आहे.
सदर स्पर्धेमध्ये एकूण जवळजवळ पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद अहमदनगर कोल्हापूर सोलापूर अशा विविध ठिकाणाहून 800 खेळाडू सहभागी होणार आहे सदर स्पर्धेसाठी कृष्णा व्हॅली येथील बॅडमिंटन हॉल टेबल टेनिस स्पर्धेसाठी तयारी केली असून अद्यावत लाईटची व्यवस्था केलेली आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून विविध भागातून खेळाडू सहभागी होणार आहेत.
सदर स्पर्धेसाठी रोख रक्कम दोन लाख रुपये पर्यंत सर्व गटांमध्ये रक्कम विभागून देण्यात येणार आहे तसेच सर्वांना प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे यासाठी सुरज फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी खास करून एनजी कामत सचिव सुरज फाउंडेशन मा संगीता बागणी डायरेक्टर सुरज फाउंडेशन विनायक जोशी इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी व विविध संस्थेचे प्रमुख गौतम कुलकर्णी सचिव सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन मा संजय बजाज अध्यक्ष सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन मा. रघुनाथ सातपुते एडमिन ऑफिसर व महाराष्ट्र राज्याचे सचिव मा यतीन टिपणी है सर्व जबाबदारी पार पाडत आहेत तरी सदर स्पर्धेचा सर्व सांगलीकरांनी आनंद घ्यावा यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून जवळजवळ 25 मान्यवर पंच उपस्थित राहणार असून त्यांची निवास व भोजन व्यवस्था सुद्धा केलेली आहे.