पातूर – निशांत गवई
पातुर येथील तहसील कार्यालय मध्ये औरंगाबाद येथील काही महिला शासकीय कामानिमित्त तहसील कार्यालय मध्ये आल्या होत्या कामे करीत असताना धावपळीमध्ये त्यांचे रोकड आणि सोन्याचे दागिने साडे सतरा हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट तहसील कार्यालयामध्ये पडले होते सदरचे पाकीट महा ई सेतूकेंद्र येथील ऑपरेटर विशाल दाभाडे यांना सापडल्यानंतर सदरचे पाकीट पैसे दागिने त्यांनी त्यांचे मित्र अनिल दळवी,
राजेश वानखडे यांच्यासह सदर महिलांचा शोध घेऊन त्यांचे दागिने आणि रोकड परत करून मानवता दाखवली सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये पैसा आणि सोने याच्या मागे नागरिक धावतात सोने आणि पैसा मिळावा यासाठी नियमबाह्य गैर कायदेशीर कामे केली जातात मात्र सध्याच्या युगात सुद्धा माणुसकी आणि इमानदारी जिवंत असल्याचे सेतू केंद्रातील ऑपरेटर विशाल दाभाडे यांनी दाखवली याबाबत सेतू केंद्राचे संचालक सचिन वाकचवरे यांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले.