रामटेक – राजु कापसे
जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे शालांत परीक्षेत मेरिट आलेल्या गुणवंतांचा, Ph.D. प्राप्त व CA उत्तीर्ण गुणवंतांचा, क्रिडा क्षेत्रातील गुणवंतांचा तसेच संस्थेच्या ज्येष्ठ आजीवन सभासदांचा विशेष सत्कार पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे, प्रा. डॉ. संजय ढोबळे, सौ. दिपाताई हटवार ,मा.बाबूरावजी वंजारी यांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी मा. रमेशभाऊ गिरडे होते.
यावेळी सौ कांचनमाला मोरेश्वर माकडे यांची ग्राहक संरक्षण परिषद नागपूर येथे कलेक्टर नागपूर जिल्हा यांच्याद्वारे तीन वर्षासाठी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला. सुञ संचालन प्रदीप लाखे, प्रास्ताविक शंकरराव भुते आणि आभारप्रदर्शन मिलिंद माकडे यांनी केले.
यावेळी श्री गुलाबराव जुननकर, शेषराव सावरकर, घवघवे, टापरे, ढोबळे, सौ बबिता मेहर, प्रमोद महाजन, दादा इटनकर, कामडे, अजय धोपटे, आस्था जंजाळ, आर्या जंजाळ, सुनील मानापुरे, चन्ने, रोकडे, वंजारी, चकोले, रामू वंजारी, बोरकर, महाकाळकर, साठवणे, नाना ढगे, सावरकर संताजी ब्रिगेड नागपूरचे सचिव श्री अजय धोपटे व भैयालाल माकडे व समाजातील अन्य मान्यवर मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यातच रामटेकच्या दोन दहाव्या वर्गातील जुळ्या भगिनी कुमारी जौजाळ 94%गूण यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन केल्याबद्दल जवाहर विद्यार्थीगृहाचे आयोजक समाजबांधवाचा चेहर्यावर वेगळाच उत्साह व आनंद यावेळी बघायला मिळाला. समस्त आयोजक समितीचे मनापासून अभिनंदन.