Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यराजकीय चेहरा दाखवू तरच, आपण आरक्षण टिकवू - ॲड. प्रकाश आंबेडकर :...

राजकीय चेहरा दाखवू तरच, आपण आरक्षण टिकवू – ॲड. प्रकाश आंबेडकर : ओबीसींचे १०० आमदार विधानसभेत गेले पाहिजेत…

सोलापूर : वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण बचाव यात्रेचे जोरदार स्वागत पंढरपूर येथे करण्यात आले. या वेळी ओबीसींनी राजकीय चेहरा दाखवला नाही, तर आरक्षण वाचणार नाही. ज्या दिवशी आपण आपला राजकीय चेहरा दाखवू, तेव्हाच आपण आरक्षण टिकवू. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथील सभेत व्यक्त केले.

मिळालेले अधिकार टिकवणे जसे महत्वाचे आहे, तसे ओबीसी म्हणून ओळख टिकवणे हे सुद्धा महत्वाचे असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले. ॲड. आंबेडकर म्हणाले की, ओबीसींचे 100 आमदार विधानसभेत गेले पाहिजेत. 100 आमदार जर विधानसभेत गेले तर कोणताही ठराव ओबीसींच्या विरोधात मंजूर होत नाही हे लक्षात घ्या. ही लढाई राजकीय लढाई आहे.

भारतीय जनता पक्षाने जर ओबीसींची बाजू घेतली आणि जरांगेनी भाजपवर टीका केली तर मी समजू शकतो की, हे भांडण आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही. तरीही जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. राजकारण लक्षात घ्या. यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

ॲड. आंबेडकर यांनी पुढे बोलताना काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, एससी आणि एसटीप्रमाणे ओबीसींचे आरक्षण संविधानिक असावे असे आम्हाला वाटत होते. त्यासाठी ओबीसींची सूची ही घटनेचा अंतर्भाग करायची होती. त्यावेळचे दोन पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांच्याशी बोलण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यातील काँग्रेससोबत बोलण्यासाठीच्या समितीत मी सुद्धा होतो. तेव्हा काँग्रेसवाल्यांना मी म्हणालो की, हे झालं पाहिजे तेव्हा काँग्रेसने सरळ सांगितले की, आम्हाला यामध्ये रस नाही.

आरक्षण बचाव यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. राज्यभरात ही यात्रा  मोठ्या उत्साहात सुरू आहे. अनेक ओबीसी संघटना आणि संघटनांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. तसेच या यात्रेला सगळीकडे मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: