Friday, November 22, 2024
Homeव्यापारतरच UPI पेमेंटवर भरावे लागेल 1.1 टक्के शुल्क!...

तरच UPI पेमेंटवर भरावे लागेल 1.1 टक्के शुल्क!…

न्युज डेस्क – UPI पेमेंटसाठी वेगळे शुल्क आकारावे लागणार अश्या आशयाच्या अनेक बातम्या आल्यात, त्यावर NPCI ने परिपत्रक काढून वापरकर्त्यांचा गैरसमज दूर केला. मात्र UPI पेमेंट करण्यासाठी कोणाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. आज आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत फक्त UPI व्यवहारावर आकारले जाणारे शुल्क.

UPI मर्चंट ट्रान्झॅक्शन (UPI Merchant Transaction) वर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (Prepaid Payment Instrument) लागू होईल. जर एखाद्या व्यक्तीने मोबाईल वॉलेटच्या मदतीने व्यापाऱ्याला पेमेंट ट्रान्सफर केले तर त्याऐवजी इंटरचेंज फी लागू होईल आणि हे शुल्क व्यापाऱ्याकडून घेतले जातील. म्हणजेच 1.1 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त इंटरचेंज फी घेतली जाईल. इंटरचेंज शुल्क व्यापारी, मोठे व्यापारी आणि छोटे ऑफलाइन व्यापारी यांना लागू होणार आहे.

कार्ड आणि वॉलेट PPI अंतर्गत समाविष्ट आहेत. या दोन्ही पद्धतींच्या मदतीने पेमेंट करण्यासाठी तुम्हाला हे शुल्क भरावे लागेल. सहसा असेही दिसून येते की जेव्हा तुम्ही कार्डद्वारे पैसे भरण्यास सांगता तेव्हा दुकानदार तुमच्याकडून अतिरिक्त शुल्काची मागणी करू लागतो. ही फी नवीन नसली तरी ती फार पूर्वीपासून लागू केली जात आहे.

वॉलेट शुल्क – NPCI च्या परिपत्रकात अशी माहिती देण्यात आली आहे की पीअर-टू-पीअर (P2P) आणि पीअर-टू-पीअर-मर्चंट (P2PM) मधील बँक खाते आणि PPI वॉलेट यांच्यातील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारावर वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. UPI पेमेंट अजूनही सामान्य वापरकर्त्यासाठी (UPI Payment Normal User) पूर्णपणे मोफत राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबत एक बातमी व्हायरल झाली होती. यावर एनपीसीआयने स्पष्टीकरण देत कोणतेही नवीन शुल्क आकारले जात नसल्याचे सांगितले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: