Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodayOnline Passport | पोलीस पडताळणीशिवाय पासपोर्ट तीन दिवसांत घरी पोहोचेल!...जाणून घ्या कसा?...

Online Passport | पोलीस पडताळणीशिवाय पासपोर्ट तीन दिवसांत घरी पोहोचेल!…जाणून घ्या कसा?…

न्युज डेस्क – जर तुम्हाला ऑनलाईन पासपोर्ट अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आज याबाबत महिती देत आहोत. अशा प्रकारे तुम्ही सहज पासपोर्ट बनवू शकता आणि तुम्हाला वेगळे काही करण्याचीही गरज नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्हाला फक्त 3 दिवसात पासपोर्ट मिळू शकतो. पण तुम्हाला तत्काळ पासपोर्ट सेवा घ्यावी लागणार आहे.

पासपोर्ट इंडिया साइटवर उपलब्ध माहितीनुसार, अर्ज सबमिट केल्यानंतर, तुमच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल आणि अंतिम मंजुरीनंतर, तिसऱ्या दिवशी ते पाठवले (Dispatch) जाईल. म्हणजेच तिसऱ्या दिवशी पासपोर्ट तयार होईल. यासोबतच पोलीस पडताळणी अहवालाचीही (Police Verification Report ) वाट पाहिली जात नाही.

फी किती आहे?

सामान्य पासपोर्टसाठी (Normal Passport) , तुम्हाला 1500 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर तत्काळ पासपोर्टच्या बाबतीत ते वेगळे आहे. येथे तुम्हाला अतिरिक्त तत्काळ शुल्क भरावे (Additional Taatkaal Fees)लागेल जे रु 2,000 आहे. तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यास तुम्हाला शुल्क अगोदर भरावे लागेल.

यानंतर तुमचा अर्ज सबमिट केला जाईल आणि भेटीची तारीख निवडल्यानंतर तुम्हाला जवळच्या पासपोर्ट केंद्राला भेट द्यावी लागेल. 36 पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी तुम्हाला 3500 रुपये द्यावे लागतील. 40 पानांच्या तत्काळ पासपोर्टसाठी तुम्हाला 4000 रुपये शुल्क द्यावे लागेल.

तत्काळ पासपोर्टसाठी कोणीही अर्ज करू शकतो. नागालँडमध्ये राहणारे लोक तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करू शकत नाहीत. पासपोर्ट कार्यालयाला तत्काळ पासपोर्ट जारी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तत्काळ पासपोर्टसाठी अल्पवयीन मुले देखील अर्ज करू शकतात. मात्र यासाठी प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: