न्युज डेस्क – OnePlus 12 सीरीज 23 जानेवारीला भारतातही लॉन्च होणार आहे. OnePlus ने ‘Smooth Beyond Belief’ लॉन्च इव्हेंटची घोषणा केली आहे. कंपनी अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित करत आहे, ज्यामध्ये ती आपल्या नवीन उत्पादनांचे अनावरण करते.
23 जानेवारी रोजी 5.30 वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार. राजधानी नवी दिल्लीत ‘Smooth Beyond Belief’ होणाऱ्या लॉन्च इव्हेंटमध्ये सामान्य लोकांनाही सहभागी होता येणार आहे. तुम्ही तिकीट खरेदी करून कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता.
OnePlus officially confirmed the launch date of OnePlus 12 series!
— OnePlus Club (@OnePlusClub) December 15, 2023
🗓️ It’s coming on January 23, 2024 at 09:00 EST/7:30PM IST
OnePlus has confirmed that its launching both the OnePlus 12 & OnePlus 12R.#OnePlus12 #OnePlus12R #OnePlus pic.twitter.com/mCM7Dt8krx
OnePlus प्रेमींना या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी, 3 जानेवारीपासून कम्युनिटी तिकिटे विकली जातील. ज्यांना कार्यक्रमाला हजेरी लावायची आहे ते PayTM Insider आणि OnePlus.in वर बुकिंग करू शकतात. रेड केबल क्लबच्या सदस्यांना ५० टक्के सवलतीत तिकिटे मिळतील. तिकिटांच्या किमती आणि श्रेणी अद्याप उघड करण्यात आलेल्या नाहीत.
नुकतीच ही स्मार्टफोन सीरीज चीनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. वनप्लस 12 ला पहिल्या सेलमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहें. या स्मार्टफोनमध्ये आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर ‘Snapdragon 8 Gen 3’ बसवण्यात आला आहे.
चीनमध्ये लॉन्च केलेल्या OnePlus 12 मध्ये 6.82 इंच वक्र OLED QHD+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 3168 x 1440 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 5,400mAh बॅटरी आहे जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, तर 50W वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50MP Sony LYT-808 प्राथमिक कॅमेरा, 64MP OmniVision OV64B कॅमेरा आणि ऑटोफोकस सपोर्टसह 48MP Sony IMX581 अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. समोर 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ColorOS 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.