Thursday, September 19, 2024
Homeराज्यक्षुल्लक कारण वरून अल्पवईन मुलाने केलेल्या चाकू हल्ल्यात एक गंभीर जखमी...

क्षुल्लक कारण वरून अल्पवईन मुलाने केलेल्या चाकू हल्ल्यात एक गंभीर जखमी…

पातूर – निशांत गवई

पातूर शहरातील बाळापूर मार्ग वर असलेल्या सिदाजी मंगल कार्यालय येथे क्षुल्लक कारण वरून एका अल्पवईन मुलाने केलेल्या चाकूहल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्या चि घटना दिनांक 12 च्या रात्री घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि सिदाजी मंगल कार्यालय येथे एक लग्न समारंभ आयोजित होते त्या ठिकाणी महिलांचे नाचगाणे सुरु असतांना हल्लेखोर मुलगा हा महिलांना पाहत असतांना त्या ठिकाणी अभिषेख प्रेमदास राठोड याने तू महिलांना का पाहत आहे.

असा जाब विचारला असता तू बाहेर चल तुला दाखवतो असे म्हणून ओढत बाहेर नेले आणि चाकू ने अभिषेख याच्या पोटात, पायावर खांद्यावर चाकू ने हल्ला केला यात अभिषेख हा गंभीर जखमी झाला असून फिर्यादी प्रेमदास रोशन राठोड याचे तक्रारी वरून पातूर पोलीस स्टेशन येथे अप नंबर 326/24 कलम 307 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोर अल्पवईन युवकास ताब्यात घेण्यात आले असून ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली पुढील तपास पातूर पोलीस करत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: