Friday, January 10, 2025
Homeगुन्हेगारीअज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू…

रामटेक – राजू कापसे

मंगळवार दि. १४ मार्च ला सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय महामार्ग नागपुर – जबलपूर वरील आमडी येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर आज अपघात होवुन त्यात एका ५१ वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याची घटना घडली.

मृतकाचे नाव मनोहर लांबट वय ५१ रा. कांद्री ( कन्हान ) असे असुन ते पारशिवणी मार्गावरील सुर्यअंबा कंपनीमध्ये कार्यरत होते. माहितीनुसार मृतक हे आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच 31, 1589 ने कंपनीतुन कांद्रीहून (घराकडे) जात असताना आमडी परीसरात अचानक अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. त्यात मनोहर लांबट यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी तत्काळ पारशिवनी पोलिसांना माहिती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: