पातुर – निशांत गवई
वीज कंपनीचे खासगीकरण रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बुधवारी संपाचे दरम्यान पातुर येथे निषेध. सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महावितरण, महापारेषण चे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई येथील महावितरणचा काही भाग अदानी समूहाला देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. या निर्णयला सर्व वीज कर्मचारी संघटना यांनी विरोध केला. राज्यातील सर्व वीज अधिकारी, कर्मचारी संघटना यांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समिती मार्फत लढा देण्याचा निर्धार केला. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात आले आहे.
या आंदोलनाचा एक भाग म्हमून 4 जानेवारी पासून तीन दिवसाचा संप पुकारण्यात आला. या संपला शंभर टक्के सहभाग घेतला. यावेळी पातुर उपविभागीय कार्यालयासमोर गोपाल गाडगे यांच्या नेतृत्वात निदर्शने देण्यात आली. यावेळी संतोष निमकंडे, महेंद्र खोकले, प्रविण तायडे,निलेश बोचरे,रमेश तायडे, अमोल बरडे, सपना सुरवाडे, शुभागी हिरोडे,नरेश उगले,
बाबारावं ठाकरे, संतोष राऊत, देविदाड पांडे, राहुल राठोड, राजेश चव्हाण,संगीता बंड, वंदना देवकर, राजू सौंदळे, आशिष गुलालकरी,अनिकेत पाटील, रणजित जाधव,आशिष गवई,उमेश इंगळे, दगडू खुळे,अक्षय मालसुरे,गणेश बंचर आदिसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.