सांगली – ज्योती मोरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी – प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी’ या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.
या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्याच्या जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.
यावेळी बैठकीत प्रामुख्याने बूथ कमिटी,सभासद नोंदणी तसेच प्रभागातील स्थानिक प्रश्नांची सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे योगदान याबाबत सविस्तर प्रभागनिहाय चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सद्या ऑनलाईन फ्रॉडबाबत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तक्रार येत आहेत.
याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणेबाबत पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज “एक तास राष्ट्रवादी साठी ” बैठक राष्ट्रवादी सांगली शहराध्यक्ष मा.सागर घोडके यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे संपन्न झाली.
यावेळी राष्ट्रवादी चे सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके,हरिदास पाटील ,मुश्ताकअली रंगरेज ,उत्तम कांबळे , अनिता पांगम ,डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे, गॅब्रियल तिवडे, रामभाऊ पाटील , फिरोज मुल्ला, विद्या कांबळे, सुरेखा सातपुते ,रुपाली कारंडे, रिहाना सय्यद, चंद्रकांत नाईक, प्रकाश सूर्यवंशी, नंदकुमार घाडगे, सुभाष तोडकर,
अझरुद्दीन पटेल , टिपू पटवेगार ,सनाउल्ला बावचकर , जावेद जमादार ,लक्ष्मण मोने,युवराज नाईकवाडे, अभिजित रांजणे,समाधान मोहिते ,विश्वास लोंढे, अंजर फकीर ,समर्थ आरगे, आदर्श कांबळे,विजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते