Sunday, December 22, 2024
Homeराज्यसहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची एक दिवसीय कार्यशाळा; जिल्हा सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी...

सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींची एक दिवसीय कार्यशाळा; जिल्हा सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचा पुढाकार…

अकोला जिल्हा सहकारी संस्था पतसंस्था फेडरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ एप्रिल शणीवार रोजी एक दिवसीय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींच्या कार्यशाळेचे आयोजन निशांत टावर सभागृह गांधी रोड अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन डॉ प्रविण लोखंडे जिल्हा निबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या हस्ते होईल, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश भाऊ पोहरे संस्थापक अध्यक्ष निशांत मल्टिस्टेट को आफ क्रेडिट सोसायटी अकोला हे राहतील, प्रमुख अतिथी अभयकुमार कटके सहायक निबंधक प्रशासन आधिन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यांच्या उपस्थितीत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या एक दिवसीय कार्यशाळांमध्ये दिनांक २७ एप्रिल शणीवार रोजी सकाळी १० वाजता नोंदणी, या नंतर सकाळच्या सत्रात रमेश चौधरी सनदी लेखापाल पतसंस्था करीता आयकर कायद्यातील तरतुदी व रिटर्न दाखल करण्याची पध्दती या विषयावर मार्गदर्शन राहील, श्रीकांत खाडे सेवावृत्त सहाय्यक निबंधक,

सहकारी कायदा व नियमावली संचालकांच्या जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन राहील, घनशाम चांडक सनदी लेखापाल, सहकारी पतसंस्था अंतर्गत अभिलेखे व अंकेक्षण या विषयावर मार्गदर्शन केले जाईल, दुपारच्या सत्रात, आर. एस.बोडखे माजी व्यवस्थापक को आफ बँक,कर्ज वितरण करताना घ्यावयाचे दस्तऐवज या विषयावर मार्गदर्शन, बाळकृष्ण काळे माजी व्यवस्थापक को आफ बँक, रोखता व तरलता काढण्याची पद्धती व एनपीए चे सुधारीत निकष आणि आँनलाईन प्रणाली,

पतसंस्थांना कामकाजात येणाऱ्या अडचणींवर उपाय व चर्चा व मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन केले जाईल, तरी अकोला जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचे प्रतिनिधींनी या एक दिवसीय सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींच्या कार्यशाळा आयोजित उपस्थित राहावे असे आवाहन नारायण अवारे, जगदीश मुरुमकार,रवी पाटणे, उध्दव विखे, विनोद मनवानी, विवेक हिवरे, भास्कर पिलात्रे, श्यामलाल लोहा, बाळकृष्ण काळे, संजीव जोशी, श्रीकांत खाडे, यांनी केले आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: