Thursday, January 9, 2025
Homeराज्यउद्योजकासाठी सोमवारी एकदिवसीय कार्यशाळा...

उद्योजकासाठी सोमवारी एकदिवसीय कार्यशाळा…

अमरावती – दुर्वास रोकडे

राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे. राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणेसाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्यासाठी सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सीए भवन, सातुर्णा इंडस्ट्रियल इस्टेट अमरावती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली IGNITE Maharashtra या एक दिवशीय कार्यशाळेत विविध योजनाचे तज्ज्ञ व्याख्यातांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्योग सहसंचालक Director General of Foreign Trade चे प्रतिनिधी तसेच SIDBI ONDC, POST OFFICE MAITRI यांच्याशी संबंधित अधिकारी आयात व निर्यात क्षेत्रातील अनुभवी प्रवक्त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

या सुवर्णसंधीचा अमरावती जिल्ह्यातील सर्व उद्योजक औद्योगिक संघटना एफपीओ शेतकरी कंपन्या एफपीओ, एक्स्पोर्ट करण्यास इच्छुक युवक-युवती तसेच सध्या कार्यरत एक्स्पोर्टर्स यानी सक्रिय सहभागी होऊन जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे. तसेच कार्यशाळा ही उद्योजक व निमंत्रकांसाठी निशुल्क आहे. तरी या कार्यशाळेतचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: