धम्म मंगलम बहुउद्देशीय संस्थेच्या चित्तविवेका जागतिक ध्यान साधना केंद्र येथे नुकतेच दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी एकदिवशीय ध्यान साधना शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये नावयाना मॉनेस्ट्री श्रीलंका येथून विनयशील भंते आदरणीय बोधिधर्मन नावयाना मॉनेस्ट्री श्रीलंका येथून मार्गदर्शन व प्रवचन करण्यासाठी आले होते. खरा बुद्धीजम भारतामधून नष्ट होण्याची कारणे समजावत त्यांनी आज धम्माच्या पुनर्जीवनासाठी विनय कसे आवश्यक आहे यावर प्रकाश टाकला.
भिक्खूनी आणि उपासकांनी विनय कसे पालन करावे हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सविस्तररित्या आदरणीय भंते बोधिधर्मन यांनी उपासकांना समजावले. प्रत्येक दुःखाचे कारण आसक्ती व तृष्णा आहे. यापासून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कसे दूर राहता येईल, याबद्दल सुद्धा आदरणीय भंते यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनामध्ये सतत जागृत राहून आपली सती व प्रज्ञा कशी विकसित करता येईल यावर सुद्धा त्यांनी प्रकाश टाकला.
तसेच म्यानमार येथील पाओक ध्यानसाधना केंद्र व श्रीलंका येथील नावयाना ध्यानसाधना केंद्र येथील शीलवान आणि विनयशील भिक्खू संघ भारतामध्ये धम्म पुनर्जीवित व्हावा यासाठी श्रद्धापूर्वक आपणास मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत हे सुद्धा भंतेनी आवर्जून सांगितले. आपण केवळ हा तथागत बुद्धांचा सद्धम्म स्वीकारण्यासाठी व त्या माध्यमातून जास्तीत जास्त जीवांचे कल्याण कसे होईल यासाठी तत्पर राहूया. अशी आशा आदरणीय भंतेजी यांनी व्यक्त केली.
या दिवशी धम्म मंगलम संस्थेच्या चित्त विवेका ध्यानसाधना केंद्राच्या बांधकामास सुरुवात झाली. याप्रसंगी मुंबई नागपूर अकोला चंद्रपूर गोंदिया गडचिरोली औरंगाबाद येथून जवळपास 100 साधक उपस्थित होते याप्रसंगी सर्व साधाकांनी आनंदाने व स्वच्छने बांधकामाप्रसंगी सेवा दिली.
धम्म मंगलम संस्थेच्या
माध्यमातून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका जवळ 12 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात नदी क्षेत्राजवळ आपल्या सर्वांच्या धम्म मार्गावर प्रगती हेतू जागतिक धम्म व ध्यान अभ्यास केंद्र 6 एकर परिसरामध्ये बनविण्यात येत आहे.
चित्तविवेका जागतिक ध्यान साधना केंद्र येथे भिख्खू निवास, उपासक निवास, लहान मुलांसाठी संडे स्कूल, ध्यान व धम्म अभ्यास हेतू शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
धम्म मंगलम’ ही संस्था गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्रभर तथागत भगवान बुद्धांच्या धम्म प्रचार व प्रसार करण्याचे काम करीत आहे. म्यानमार येथील पाओक मॉनेस्ट्री व श्रीलंका येथील नावयाना फॉरेस्ट मॉनेस्ट्री यांच्या धरतीवर महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर येथे निसर्गरम्य वातावरणामध्ये दहा एकर जमिनीवर ‘चित्त विवेका आंतरराष्ट्रीय ध्यान साधना केंद्र’ उभारण्याचे काम धम्मंगलम संस्थेतर्फे हाती घेण्यात आले आहे.
तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म जसाच्या तसा जनसामान्यांमध्ये कसा रुजवता येईल यासाठी धम्मंगलम संस्थेमार्फत महाराष्ट्रभर प्रत्यक्ष ध्यानसाधना शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. कोरोना काळापासून ते आज पर्यंत रोज सकाळी ऑनलाईन ध्यान साधना घेतली जाते. गेल्या अडीच वर्षापासून या सकाळच्या ध्यानसाधना सत्रामध्ये झूम मीटिंग द्वारा 300 पेक्षा जास्त साधक नियमितपणे सहभागी होत असतात. तसेच संस्थेमार्फत बाहेरील देशांमध्ये विनयशील भंतेजींना ऑनलाइन प्रवचनासाठी आमंत्रित केल्या जात असते.