मुर्तिजापूर – नरेंद्र खवले
मुर्तिजापूर (ता.प्र) स्थानिय वकील संघाच्या हॉलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे आदेशान्वये मा. जुडीशियत अॅकडमी अँन्ड इंडीयन मेडीऐशन सेन्टर अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिीटुट उत्तान ठाणे यांचे आदेशानुसार विधिज्ञ व त्यांचे कारकुन यांचे करीता एक दिवस ई-कोर्ट प्रोग्राम आयोजीत करुन ई-कोर्ट प्रोग्रामाबाबत व नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मुर्तिजापूर न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधिश आसिफ तांबोळी, तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन मुर्तिजापूर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. भुषण मुळे, वकील संघाचे सचिव कु. राधिका भुषण तिडके (काळे) तसेच अॅड. मास्टर ट्रेनर प्रदिप पी. पाटील हे होते.
न्यायाधिश तांबोळी यांनी ई-कोर्ट प्रोग्राम बाबत तसेच नवीन कायदा भारतीय न्याय संहीता (बीएनस) बाबत सविस्तर माहीती दिली. तसेच वकील संघाचे अध्यक्ष भुषण मुळे यांनी ई-कोर्ट चे महत्त्व समजून सांगितले. अॅड. मास्टर ट्रेनर प्रदिप पी. पाटील यांनी ई कोर्ट संबंधी मार्गदर्शन केले. यावेळी मुर्तिजापूर वकील संघाचे सर्व विधितज्ञ, कारकुन, न्यायालय कर्मचारी आदी उपस्थित होते.