सांगली – ज्योती मोरे
जत तालुक्यातील मुचंडित मक्याच्या शेतात गांजाची लागवड करणाऱ्या श्रीकांत धनाप्पा स्वामी वय वर्षे 47 राहणार कनंमडी तालुका निकोटा जिल्हा विजापूर यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जत पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत 38 हजार 410 रुपये किमतीचा सात किलो 682 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
त्याच्यावर जत पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 क 20 ब तसेच 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीसह मुद्देमाल जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली , पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे ,जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, अच्युत सूर्यवंशी, आमसिद्ध खोत, निलेश कदम,जत पोलीस ठाण्याकडील अंमलदार गणेश संकपाळ, विजय कोळेकर, विजय चव्हाण, राज सावंत, वाहिद मुल्ला, सतीश माने,श्री गौंड आदींनी केली.