मूर्तिजापूर :- नरेंद्र खवले
“वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने वृक्षरोपण हे फोटोसेशन पुरते मर्यादित न ठेवता “झाडे लावा,झाडे जगवा” हा मुलमंत्र जपने प्रत्येक नागरिकांरी ची जबाबदारी आहे”, असे तालुका वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र नेमाडे हे लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हात १० लक्ष वृक्ष लावण्याचा संकल्प अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केलेल्या आव्हानास अनुसरून मुर्तीजापुर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक पर्यावरण दिनी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय कर्मचारी वर्ग व महाकाल सेना च्या संयुक्त विद्यमाने विविध प्रजातीच्या ५० वृक्षाची लागवड करून त्यास जगवण्याची व संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली.
दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता, पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाचे अनियमित आगमन यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजणांच्या कुटुंबासाठी पुरेसा ठरेल, एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळेच आता वर्षभर विविध सण-समारंभ वा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण करणे आरोग्याच्या दृष्टीने काळाची गरज आहे असे उपस्थितांना डॉ गौरव गोसावी संबोधित करते वेळी बोलत होते.
यावेळी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ गौरव गोसावी, डॉ विशाल येदवर, डॉ पोर्णिमा अवघाते, डॉ दिपाली शेळके, डॉ गावंडे मॅडम, महाकाल सेनेचे अध्यक्ष लखन मिलांदे, पुंडलिक संगेले, राहुल कंझरकर, गौतम डेंडुले, शुभम धामणे, आदित्य खंडारे, रोहित श्रीवास, अक्षय धामणे, संतोष करणे, रमेश देवीकर, अमन संगेले, परिचारिका विभागाच्या पदई मॅडम,डांगे सिस्टर, कोकाटे सिस्टर, देशमुख बाप्पू आदी वैद्यकीय विभागाचे कर्मचारी व महाकाल सेनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.