Saturday, November 16, 2024
Homeराज्यजंगल सफारीच्या पहिल्याच दिवशी वाघांची डरकाळी...

जंगल सफारीच्या पहिल्याच दिवशी वाघांची डरकाळी…

पेंच व्याघ्रमध्ये पर्यटकांनी लुटला पहिल्याच दिवशी आनंद

रामटेक – राजु कापसे

देशातील सर्वञ नावाजलेला व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असलेल्या आणि जैवविविधतने नटलेल्या रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघासह विविध वन्यजीवांचे दर्शन पर्यटकांना होते.

वाघाची डरकाळी अन् मोराचा केकारव असा जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना अनुभव येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्पाची द्वारे मंगळवार पासून पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी खुला झाला. अन् पहिल्याच दिवशी टी- ६२ वाघीण ३ बछड्यांसह दिसल्याने पर्यटक फार आनंदी झाला. सदर वाघीण फेफाडीकुंड रस्त्यावर दिसून आली. आणि तिला कॅमेरॅत कैद केले सुशांत शाह व सौरभ सिंग या पर्यटकांनी.

वाघांसह वन्यजीवांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी विदर्भासह विदर्भाबाहेरील पर्यटक येतात. इतकेच नव्हे तर या ठिकाणी आतापर्यंत अनेक व्हीव्हीआयपींनीही हजेरी लावून जंगल सफारीचा आनंद लुटते आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत हा व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी बंद असतो. तर आता मंगळवारपासून पुन्हा हा व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी खुला करण्यात आला आहे. या व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करणाऱ्यांना १५ ऑक्टोंबरपर्यंत ऑफलाइन पद्धतीने बुकींग करावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन बुकींगची सुविधा सुरू केली जाणार आहे.

१९७५ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात टि-६२, टि-२४, टि-१०१, नामक वाघिण तसेच टि-८५,टि-९३ नामक रुबाबदार वाघ आहे. त्यांची एक झलक बघण्याची इच्छा येथे जंगल सफारीसाठी येणाऱ्यांना असते.रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प जंगल सफारीसाठी खुला होणे ही बाब वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बातमीच आहे.

बफर क्षेत्रात राहते टायरगरची मुव्हमेंट

१९७५ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेल्या सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन ४३९.८४ कि.मी, तर बफर झोन २०५.०३ कि.मी. इतका आहे. या व्याघ्र प्रकल्पात सुमारे ५५अधिक प्रौढ वाघांचे वास्तव्य आहे.
७० जीप्सी जंगल सफारीसाठी
५० पेक्षा अधिक प्रौढ वाघांचे वास्तव
४३९.८४कि.मी कोअर क्षेञ
२०५.०३ कि.मी बफर क्षेञ

या व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र वाघ, बिबट, अस्वल आदी वन्य जीवांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरत असून; पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातही वाघांची मुव्हमेंट असते.

पेंच व्याघ्र प्रकल्पात मंगळवारपासून जंगल सफारी सुरू होत आहे. सुरूवाती पासूनच ऑनलाइन बुकींग सुरू झालेली आहे.सफारी करीता सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आज पहिल्याच दिवशी टी ६२ वाघीण तिन छावकांसह दिसुन आल्याने पर्यटकांत पहिल्याच दिवशी आनंद दिसुन आला.
विवेक राजुरकर वनपरिक्षेञ अधिकारी पेंच व्याघ्र प्रकल्प, सिल्लारी

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: