महाराष्ट्र शासनाने भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र ह्या अनुषंगाने दिनांक 31।10।22 ते 6।11।22 पर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्याचे आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम तर्फे जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, त्या अनुषंगाने दिनांक 31।10।22 रोजी सकाळी 11।00 वा भ्रष्ट्राचार मुक्ती ची शपथ घेऊन त्या नंतर वाशिम शहरात विविध ठिकाणी व शासकीय कार्यालयात भित्तीपत्रके/ फलक लावणे,
भ्रष्ट्राचाराची तक्रार कुठे व कशी करावी ह्या बद्दल माहिती देणारे पोम्प्लेट वितरण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, दिनांक 1।11।22 रोजी पुरुषोत्तम बाबा निर्मल कला संच आडोळी ह्यांच्या कलाकारांचा भ्रष्ट्राचार विरोधी पथनाट्य मालेगाव व शिरपूर जैन येथे आयोजित करण्यात आला आहे, तसेच विविध सामाजिक माध्यमाद्वारे भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी माहिती देणारे मेसेजेस प्रसारित करण्यात येतील तसेच स्थानिक वास्तल्गुम FM रेडिओ स्टेशन वर लाच देणे व घेणे शिक्षा पात्र अपराध असून तो टाळण्यासाठी उपाययोजने बाबत जनहितार्थ संदेश प्रसारित करण्यात येईल,
दिनांक 2।11।22 रोजी मानव बहुउद्देशीय संस्था कला पथक वाशिम संच तर्फे शेलुबाजार व मंगरुळपिर येथे पथनाट्य सादर करून परिसरात पोम्प्लेट व भित्तीपत्रके चिपकविण्यात येतील, दिनांक 3।11।22 रोजी समाज जागृती कला बहुउद्देशीय संस्था समता नगर वाशिम तर्फे मानोरा व कोंढोली येथे पथनाट्य आयोजित करण्यात येऊन भित्तीपत्रके व पोम्प्लेट वितरण करण्यात येणार आहे, दिनांक 4।11।22 रोजी वाशिम शहरात विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येऊन पोम्प्लेट वितरण करण्यात येणार आहे व FM वरून संदेश प्रसारित करण्यात येणार आहे, दिनांक 5।11।22 रोजी विद्यार्थ्यांना भ्रष्ट्राचार मुक्तीची शपथ तसेच निबंध स्पर्धा आयोजन व शहरात बॅनर्स लावणे,
पोम्प्लेट वाटप हा कार्यक्रम घेण्यात येईल, दिनांक 6।11।22 रोजी जिल्ह्यातील तालुका ठिकाणी पोम्प्लेट वितरण व भित्तीपत्रके लावणे हा कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे सदर सप्ताह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड ह्यांचे मार्गदर्शनाखाली वाशिम पथकाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोलीस निरीक्षक सुरज कांबळे, पोलीस निरीक्षक ममता अफूने व सर्व अंमलदार हे राबवित आहेत