पातूर – निशांत गवई
पातूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 30 एप्रिल 2023 रविवारला जयंती साजरी करण्यात आली यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रमातर्फे निशुल्क बाल संस्कार शिबिराचे आयोजन 15 एप्रिल 2023 पासून करण्यात आले होते सतत गारपीट आणि सतत दार पावसात मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी या निशुल्क शिबिरामध्ये सहभागी होऊन अध्ययन केले.
त्याचा समारोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती दिनी म्हणजे 30 एप्रिल 2023 ला करण्यात आला यावेळी सकाळी सर्व शिबिरातील विद्यार्थी यांनी ग्रामगीतेतील ओव्या आणि राष्ट्रसंतांचे भजने गायली आणि सदर बाल संस्कार निशुल्क शिबिराचा समारोप करण्यात आला यावेळी सर्व शिबिरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रमातर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप खाकरे महाराज हे होते.
तर आश्रम चे संस्थापक अध्यक्ष संत तीमांडे महाराज यांनी या शिबिरातील विद्यार्थ्यांना योगासन प्राणायाम सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान राष्ट्रसंतांचे समाज प्रबोधनात्मक देशभक्तीपर भजने शिकविले तर कार्यक्रमाच्या शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वितरित करण्यात आला यावेळी जयवंत पुरुषोत्तम ,शालिनी पाटील, योगिता उमाळे, वर्षा आटायकर , शिवाजी कुकडकर ,रमेश कोथळकर ,शोभा कोथळकर, चंद्रभागाबाई आटायकर, नंदाताई इंगळे ,अरविंद भाजीपाले, मालाताई भाजीपाले ,वनरक्षक प्रवीण सरप साहेब सह बहुसंख्य गुरुदेव प्रेमींची उपस्थिती होती