मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
पश्चिम विदर्भातील अर्धकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मूर्तिजापूर दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेले तीर्थक्षेत्र लाखपुरी ता. मुर्तिजापूर जि.अकोला येथे सोमवती अमावस्या निमित्त पूर्णा नदी तीरावर विविध पूजा विधि करण्याकरिता व भगवान श्री लक्षेश्वराचे दर्शन घेण्याकरता सोमवारी सकाळी सहा वाजता पासून सायंकाळपर्यंत हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील भाविकांची संख्या प्रामुख्याने जास्त होती.
परिवारातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या आत्मशांति करिता सोमवती अमावस्याला विविध पूजा विधि करण्यात येतो. तीर्थक्षेत्र लाखपुरी येथे पूर्णा नदी तीरावर या विधीचे असाधारण महत्त्व असल्यामुळे अनेक भाविक येतात.
भाविकांच्या सोयीकरिता श्री लक्ष्मेश्वर संस्थान तर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. वाहनतळ. प्रसाद वाटप इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती. अनेक भाविकांनी विधी आटोपल्यानंतर भोजनाची सुद्धा व्यवस्था केली होती. यावेळी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त होता अशी माहिती श्री लक्ष्मण संस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.