मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या सीमेवरील पूर्णानदी तीरावरील पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्षेक्ष्वर संस्थान लाखपुरी , ता. मूर्तिजापूर जि. अकोला येथे परंपरेनुसार श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आज सकाळी 7 वाजता भगवान श्री लक्षेक्ष्वराला जलाभिषेक करून , हर हर महादेव संभा , काशी विश्वनाथ गंगा या शिव मंत्राचा अखंड शिवनाम जप सप्ताहला सुरुवात झाली.
ग्राम लाखपुरी येथील विविध समाजाचे , अनेक मंडळाचे पुरुष व महिला शिवभक्त तीन तीन तास शिवजप करत सप्ताहभर दिवस रात्र पाहरा देतात . यावर्षी श्रावणाच्या पहिल्या दिवशी सोमवार आल्यामुळे पूर्व संध्येला मुर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव तालुक्यातील शिवभक्त कावड घेऊन तिर्थक्षेत्र लाखपुरी येथे दाखल झाले व पूर्णा नदीचे स्नान करून भगवान श्री लक्षेक्ष्वराला जलभिषेक करून रात्री 12 वाजता आपल्या गावी कावड घेऊन पायी गेले . यावेळी संस्थानच्या वतीने प्रत्येक कावडची पुजा करण्यात आली .आणि मोठ्या उत्सवात कावड उत्सवला सुरुवात झाली.
दुसऱ्या सोमवारी दि. 12 अगस्त ला सकाळी 8 वाजता अखंड शिवनाम सप्ताहची शिव अभिषेक व पूर्णा नदीवर तिर्थ विसर्जित करून नंतर दुपारी 12 वाजता महाप्रसाद द्वारे सप्ताह सांगता होईल. तत्पूर्वी 11 वाजता दरवर्षी प्रमाणे लाखपुरी येथील श्रावणातील शेवटच्या रविवारी कावड उत्सवात सहभागी होणाऱ्या मुर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील कावड मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,पत्रकार बांधव, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, कावड उत्सवाचे सहकारी यांची बैठक पार पडेल. श्रावण महिन्यातील महिनाभर विविध कार्यक्रमाचा तसेच शिव दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आव्हान श्री लक्षेक्ष्वर संस्थान तर्फे करण्यांत आले आहे.