Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजननाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न...

नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलन निमित्त नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न…

मुंबई – गणेश तळेकर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन यास्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक  १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली.

त्यातून निवडलेल्या स्पर्धक/संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधीत मुंबई, पुणे,नाशिक, नागपूर, अहमदनगरयेथे एकांकिका (२६ संस्था), बालनाट्य (२६ संस्था) व एकपात्री (६३ स्पर्धक) येथे पार पडली. सोबत निकाल पत्रक जोडत आहे.

या स्पर्धेची अंतिम फेरी एप्रिल महिन्यात मुंबई येथे संपन्न होणार आहे. सदर अंतिम फेरीमध्ये एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन,नाट्य अभिवाचन या स्पर्धांचा समावेश आहे.

आपला,
(अजित भुरे)
प्रमुख कार्यवाह
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद

अंतिम फेरीसाठी निवडलेले एकपात्री नाटक

एकपात्रीचे नाव आणि केंद्र         
१) स्नेह दडवई – पुणे          
२) अपर्णा जोशी – पुणे         
३) पल्लवी परब- भालेकर – पुणे              
४) मृदुला मोघे – पुणे          
५) ज्ञानेश्वरी कांबळे – पुणे      
६) विनायक जगताप – पुणे      
७) वेदिका वाबळे – पुणे        
८) महामाया ढावरे – पुणे     
९) पूजा बोडके – अहमदनगर  
१०) विशाल रणदिवे – अहमदनगर            
११) सिद्धेश्वर थोरात – अहमदनगर             
१२) मिताली सातोंडकर – अहमदनगर        
१३) शशिकांत नगरे – अहमदनगर              
१४) श्वेतापारखे – अहमदनगर 
१५) किशोर पुराणिक – अहमदनगर           
१६) माधुरी लोकरे – अहमदनगर              
१७) विष्णू निंबाळकर – नागपूर
१८) सौरभ काळपांडे – नागपूर 
१९) प्राजक्ता राऊत – नागपूर   
२०) विनय मोडक – नागपूर    
२१) सीमा मुळे – नागपूर       
२२) दिपाली घोंगे – नागपूर    
२३) हेमंत चौधरी – नागपूर     
२४) मानसी मराठे – मुंबई      
२५) स्मितल चव्हाण – मुंबई   
२६) स्वानंद मयेकरमुंबई     
२७) निकिता झेपले – मुंबई    
२८) ऐश्वर्या पाटील – मुंबई      
२९) पराग नाईक – मुंबई     
३०) साहिल दळवी – मुंबई

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: