Friday, November 22, 2024
Homeराज्यमा.प्रवीणजी लुंकड यांचा ६८ वा वाढदिवस निमित्त विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा...

मा.प्रवीणजी लुंकड यांचा ६८ वा वाढदिवस निमित्त विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा…

सांगली – ज्योती मोरे.

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुपवाड एमआयडीसी मार्फत दिनांक 13 डिसेंबर २०२३ रोजी मा प्रवीणजी लुंकड अध्यक्ष सुरज फाउंडेशन यांचा 68 वा वाढदिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला दिनांक 7 व 8 डिसेंबर २०२३ रोजी उषःकाल अभिनव हॉस्पिटल मार्फत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली दिनांक 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी सुरज बिट्स व रॅपिड चेस स्पर्धा घेण्यात आली.

तसेच दिनांक 11 व 12 डिसेंबर रोजी आमंत्रित 17 वर्षाखालील मुले फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक 13 डिसेंबर २०२३ रोजी नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम इंग्रजी माध्यम सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत मा प्रवीणजी लुंकड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव एन जी कामत डायरेक्टर संगीता पागनीस स्पोर्ट्स इनचार्ज विनायक जोशी उप प्राचार्य प्रशांत चव्हाण नव कृष्णा व्हॅली स्कूलचे प्राचार्य अधिकराव पवार आयआयटी व मेडिकल इन्स्टिट्यूटचे इन्चार्ज अश्विनी माने आयटी इन्चार्ज राजेंद्र पाचोरे व दत्तात्रेय मुळे अकाउंट विभाग प्रमुख श्रीशैल मोटगी नव कृष्णा व्हॅली गुरुकुल विभागाचे प्रमुख प्रदीप पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतरी कर्मचारी उपस्थित होते.

sangli ad

यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर सुरेश पाटील सांगलीतील नामवंत इंजिनियर चिदंबर कोटीभास्कर नूतन बुद्धिबळ मंडळाचे सचिव चिंतामणी लिमये लठ्ठे पॉलिटेक्निकल चे माझे प्राचार्य रमेश चराटे बामनोळी गावचे माजी सरपंच सिंदकर व आदी मान्यवर यांनी प्रवीण सर यांना वाढदिवसाच्या प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रवीण लुंकड सर यांनी नव कृष्णा व्हॅली स्कूल मार्फत अत्याधुनिक शैक्षणिक सोयी सुविधा व त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे व अद्यावत असे नवनवीन क्रीडागण तयार करून चांगले खेळाडू तयार करण्याचा मानस व्यक्त केला या प्रसंगी नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. सर्व सामाजिक शैक्षणिक थरातून त्यांना शुभेच्छा वर्षाव होत आहे.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: