सांगली – ज्योती मोरे
आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात सकाळी १० वाजले पासून सा.मि.कु. महानगर पालिका आणि मिरजेतील सर्व नाट्य संस्था यांच्या वतीने रंगभूमी दिन साजरा करत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला मिरजेतील सर्व रंगकर्मी हजर होते.. दरवर्षीप्रमाणे ज्यांनी कलेची सेवा केलेल्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या मध्ये लोककला भेदिक शाहीर सहदेव हिरगुडे , रंगकर्मी मुकेश भोकरे, तब्बलजी रामचंद्र रूपलग , गायक संजय सावने, आणि अभिनेता प्रदिप शिंदे यांचा सत्कार जेष्ठ रंगकर्मी राम कुलकर्णी, जेष्ठ साहित्यिक भिमराव धुळूबुळू , न्यायाधिश मुकुंद दाते , आणि नगरसेवक संतोष पाटील.यांच्या हस्ते करण्यात आला . तसेच बालगंधर्व नाट्यगृहाती कर्मचारी राजेंद्र शेडबाळे , प्रबुद्ध कांबळे, अमोस कांबळे , नविन कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.
त्या नंतर सर्वांनी सामुदायिक नांदी गायली.
चैत्राली शुक्ल आणि हिरण्मयी शुक्ल यांनी गणेश वंदना नृत्य सादर केले. शाहिर सहादेव हिरगुडे यांनी भेदीक कवन सादर केलं , समर्थ कांबळे यांनी सोलो ढोलकी वादन करून रंग भरला. त्या नंतर वैष्णवी भस्मे, सारा मूल्ला, स्नेहल शिंदे यांनी. सोलो नृत्य सादर केले. सावने , राम कोळी, प्रकाश अहिरे यांनी गाणी सादर केली, आणि अतिश कांबळे, आदेश खांडेकर, दिनू खोत, हर्षवर्धन कांबळे, साहिल जमादार, स्नेहा शिंदे, निंला म्हेत्रे, यांनी लघू नाटिका सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज पलसे यांनी केले. या कार्यक्रमाला रंगकर्मी प्रशांत गोखले, सुषमा कुलकर्णी, अनिकेत ढाले ,अक्षय वाघमारे, रोहित शिंदे, विनायक इंगळे, दिगंबर कुलकर्णी व आणि कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन ओंकार शुक्ल आणि बाळ बरगाले यांनी केले होते.