रामटेक – राजु कापसे
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरातच 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळा,महाविद्यालये,शासकीय-निमशासकीय कार्यालयात अतिउत्साहात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र रामटेक तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा बोरडा येथे एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला.यात देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात कामगिरी बजावून सेवानिवृत्त झालेल्या तथा सद्यस्थितीत भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानांचा स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने स्वागत सत्कार करण्यात आले.
भारतीय सैन्य दलात सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले अनिल राऊत,सद्यस्थितीत भारतीय सेनेत कार्यरत असलेले अमर राऊत,इंडियन नेव्ही मध्ये वर्ग 2 च्या जागेसाठी निवड झालेले राहुल जिवतोडे व नुकताच BAMS पूर्ण केलेले सुरज राऊत यांचा शाल,श्रीफळ आणि रोपटे देऊन पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेड तर्फे स्वागत सत्कार करण्यात आले.