Sunday, December 22, 2024
Homeराज्यमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन विधवा मातेच्या मुलीच्या लग्नाकरिता...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन विधवा मातेच्या मुलीच्या लग्नाकरिता दहा हजार रुपयाची मदत…

नरखेड – अतुल दंडारे

नेत्याचा वाढदिवस म्हंटल की कार्यकर्ता अती उत्साहाने बॅनर,पोस्टर, मोठ मोठे होर्डिग यात अवाढव्य खर्च करतो परंतु नरखेड येथील एका कार्यकर्त्याने विधवा मातेच्या मुलीच्या लग्नाला दिला मदतीचा हात लोकनेते अनिला देशमुख साहेबांच्या निमित्ताने नरखेड येथील रहिवासी श्रीमती सविताबाई लेंडे यांच्या मुलीचा लग्नसोहळा आहे.

त्या विधवा मातेची पैशाची अडचण लक्षात घेता मा.अनिल देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेस काटोल विधानसभा अध्यक्ष उदयन बनसोड यांनी १०,०००(दहा हजार)रुपयाची मदत करून विधवा मातेच्या डोळ्याचे पाणी पुसण्याचा छोटासा प्रयत्न केला.

या वेळी अनिल देशमुख व त्यांच्या अर्धांगिनी सौ.आरतीताई देशमुख यांनी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून मुलीच्या आईला हिम्मत देऊन मुलीला वैवाहिक जीवनात सौख्य लाभो अशा शुभेछा दिल्या या प्रसंगी महिलांनी केक कापून साहेबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी राष्ट्रवादीचा शहर अध्यक्ष संजय चरडे,

माजी नगराध्यक्ष अनिल गजबे, माजी बाधकाम सभापति ओम खत्री, राष्ट्रवादी युवक काँग्रेस काटोल विधानसभा अध्यक्ष उदयन बनसोड, राष्ट्रवादी काँग्रेस नरखेड शहर युवक अध्यक्ष पंकज क्षिरसागर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमोल आरघोडे, गौरव गुरमुळे आकाश जवादे,नाभिक एकता मंच नागपुर जिल्हा अध्यक्ष राहुल कान्होलकर व परिसरातील महिला तसेच कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: