Monday, December 23, 2024
Homeराज्यमंगलमय दिनानिमित्त मंगळवारी काव्यसंग्रह कवियत्री च्या " चाहुलखुणा "...

मंगलमय दिनानिमित्त मंगळवारी काव्यसंग्रह कवियत्री च्या ” चाहुलखुणा “…

मुंबई – गणेश तळेकर

मंगळवार दिनांक :- ११ – ६ – २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता कार्यक्रम सुरू झाला, जशी पावसाची चाहुल लागते, येणाऱ्या नव्या बाळाची चाहुल लागते, तशीच आज एका अत्तरामध्ये व अक्षरामध्ये जन्म घेणाऱ्या या एका नव्या कवयित्रीच्या ” चाहुलखुणा ” आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत , चला तर मग त्याचे या नव्या प्रवासात स्वागत करूया…!

प्रज्ञा पळसुले यांच्या नव्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा डोंबिवली येथे गणेश मंदिर , विनायक हॉल येथे संपन्न झाला…! या प्रसंगी प्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , अध्यक्ष डॉ.गिरीश लटके , प्रमुख अतिथी डॉ.संगीता गोडबोले , डॉ.नंदकुमार सावंत , श्रीमती राजेश्री पोतदार , श्री रविकिरण पराडकर हे मान्यवर उपस्थित होते, सुत्र संचालन – अभिनेते श्री मकरंद पाध्ये यांनी कवितेच्या माध्यमातून रसिक जणांचे मने जिंकले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर व साहित्यिक , रसिक यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती, अनेक मान्यवर कवींनी आपले मनोगत व्यक्त करत रसिकांची सुध्दा मने जिंकली.. !

रसिकांसाठी ” चाहूलखुणा” हे ऑनलाईन विक्रीस लवकरच येतंय… व आता सध्या कोणाला हवे असल्यास या +91 77180 23236 नंबरवर संपर्क करावा…

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: