पातूर – निशांत गवई
लोकसभा निवडणुक सन २०२४ मधे निर्भय पणे मतदान व्हावे व तसेच कायदा व सुव्यवस्था व जातीय सलोखाअबाधीत राहावा व शांतता प्रस्थापीत राहावी या करीता मा पोलीस अधिक्षक श्री बच्चन सींग साहेब अकोला यांचे मार्गदर्शनाने रूट मार्चचे पातुर येथे 7 फेब्रुवारी रोजी आयोजन केले होते, त्यामध्ये १०७ बटालीयन आर ए एफ हिनोतीया,
रायसेन मध्यप्रदेशचे कमान्डटं श्री जगदीश प्रसाद बलाई व सहायक कमांडट श्री अमन कुमार यांचे मार्गदर्शनाखाली असे आर ए एफ चे दोन राजपत्रीत अधीकारी व अधीकारी ८, सैनीक ४१ असे ५१ जवानासह व बाळापुर उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक श्री गोकुल राजजी, तसेच पोलीस स्टेशन पातुरचे पोलीस निरीक्षकश्री किशोर शेळके व पोलीस स्टेशन पातुरचे १अधीकारी व २० पोलीस अंमलदार,
पोलीस स्टेशन बाळापुरचे ठाणेदार श्री अनील जुमळे व एक पोलीस अधीकारी व ९ पोलीस पोलीस अंमलदार, व पोलीस स्टेशन चान्नीचे ठाणेदार श्री विजय चव्हाण व ४ पोलीस अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय अकोला येथील ३२ पोलीस अंमलदार व ६ मोटार सायकल सह पातुर शहरातुन रूट मार्च काढण्यात आला रूट मार्च पोस्टे पातुर येथुन,
बाजार रोड, मीश्री शाहा बाबा दर्गा, मुजावरपुरा बीज, देवळी मैदान, दुस-या बीज वरून मोमीनपुरा, गुजरी लाईन चौकातुन गणपती मीरवणुक रोड वरून, बाळापुर वेस चे जवळुन, राईट टर्न घेउन भोईपुरा, काशीद पुरा, चिरा चौक,
मिलींद नगर चौकातुन, जुने बस स्टँड, पो स्टे ला 6/२० वा परत आले. रूट मार्ट व पोलीस गाड्यांचा आवाज ऐकण्याकरिता नागरिकांनी रस्त्याच्या कडेला गर्दी केली होती या रूट मार्च मुळे पातुर शहरात विविध प्रकारच्या चर्चा रंगत होत्या