पातूर – निशांत गवई
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री.कर्पूरेश्वर मंदिरात साबुदाण्याच्या उसळचा प्रसाद वितरण कार्यक्रमप्रसंगी भाविकांची मांदियाळी उसळली होती.पातूर शहरातील अकोला-वाशिम हायवेवर असलेल्या प्राचीन श्री.कर्पूरेश्वर महादेव मंदीरात सालागत प्रमाणे यावर्षीदेखील महाशिवारात्री च्या पर्वावर भाविकांची मोठ्या प्रमाणात पूजा- अर्चना करण्यासाठी गर्दी होत असते.सदर मंदिर स्वर्गवासी श्री.मारोतीजी कढोणे यांच्या शेतात असून येथील शिवलींग प्राचीन काळापासून पातूर नगरीत स्थित असून पातूरवासीयांचे आराध्य दैवत आहे.
या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार स्व.मारोती कढोणे यांनी 1999 साली स्वखर्चाने केला,त्यानंतर श्री.कर्पूरेश्वर महादेव मंदिराचे नावलौकिक वाढले व भक्तांचा गोतावळा येथे जमू लागला.दरवर्षी माहाशिवरात्रीच्या दिवशी कढोणे परिवार व मित्रमंडळीच्या वतीने येथे भक्तांचा उपवास लक्षात घेऊन साबुदाणा उसळीचा प्रसाद वितरण केला जातो.त्यानंतर सदर मंदिरातील शिवलींगावर सतत सव्वा महिना गळती म्हणजेच गंगा अभिषेक लावण्यात येतो व सव्वा महिन्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
पातूर शहराचे आराध्य दैवत श्री.कवळेश्वर महादेवाचे नंतर श्री.कर्पूरेश्वर मंदिराचे नावलौकिक असून आज महाशिवरात्री निमित्ताने आयोजित केलेल्या दीड क्विंटल साबुदाण्याच्या उसळीच्या प्रसादाचा लाभ हजारोंच्या संख्येत भाविकांनी घेतला.यावेळी सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद कढोणे,मुकेश खंडारे, राजू खंडारे, अमोल सोनोने,संजय बंड, स्वप्निल सुरवाडे,सागर बोम्बटकर,राम वाढी,आर्यन कढोणे,शौर्य कढोणे यांनी अथक परिश्रम घेतले.