मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या भीषण प्रकरणात गुन्हा नोंद्विल्या नंतर तब्बल 70 दिवसांनी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 32 वर्षीय व्यक्तीचे नाव हुइरेम हेरादास सिंग असे असून त्याला थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती एका महिलेला ओढताना दिसत आहे. सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर निषेध होत असताना ही अटक करण्यात आली आहे. या घटनेवर वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करीत सरकारला आपल्या शैलीत सुनावले आहे. काय म्हणाले ते पाहूया…
मणिपूरमध्ये घडणाऱ्या भयानक घटना नवीन नाहीत. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. अशा घटनेच्या विरोधात मणिपूरच्या महिलांनी लष्कराच्या कार्यालयावर नग्न मोर्चा काढला होता. दुर्दैवाने, सरकार भाजपचे असो वा अन्य कोणाचे, राज्याचे असो वा केंद्राचे, पूर्वोत्तर राज्यांच्या विशेष परिस्थितीचा विचार न करता मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जातात. आम्ही सरकारला यापूर्वीही इशारा दिला होता आणि आज पुन्हा इशारा दिला आहे की, चीन तिबेट आणि ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर वसाहती उभारत आहे. हे धोकादायक आहे. लोक जसे आहेत तसे स्वीकारायला शिकले पाहिजे. जर आपण आपली संस्कृती इतरांवर लादणे थांबवले तरच संपूर्ण ईशान्य, सात बहिणी आणि एक भाऊ, शांतता नांदेल आणि भारतासोबत राहील.
मणिपूरमध्ये घडलेल्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि यातील सर्व गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करतो.