राजु कापसे प्रतिनिधी
रामटेक :- काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुनील केदार आणि इतर पाच यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दोषी ठरविले असून त्यांना पाच वर्षाची शिक्षा झाली आहे. बैंक घोटाळ्यातील रक्कम व्याजासह सुनील केदार आणि इतर पाच आरोपी यांच्याकडून 1444 कोटी वसूल करून शेतकऱ्यांना दोन महिन्यात वाटप करण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पीडित शेतकरी व खातेदार यांच्या हितार्थ उदयसिंग उर्फ गज्जू यादव महामंत्री भाजपा नागपुर जिल्हा यांच्या नेतृत्बात रामटेक उपविभागीय कार्यालयावर बेधडक वसुली मोर्चा निघत आहे.
शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, बस स्टॉप रामटेक येथून रामटेक व पारशिवनी तालुक्यातील हजारो शेतकरी व मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातेधारक उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढून न्याय देण्याची मागणी करणार आहे. मोर्चला माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहले, माजी आमदार आशीष देशमुख, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. राजीव पोतदार, अरविंद गजभिये, मनोहर कुंभारे, राजेश ठाकरे, किशोर चौधरी ईत्यादि संबोधित करनार आहेत.
न्यायालयीन दोषसिद्ध शिक्षा प्राप्त सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे 153 कोटी रुपये व व्याजाचे चौदाशे 44 कोटी रुपये वसूल करून नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व खातेदारांना दोन महिन्याचे आत वाटप करण्यात यावे यासाठी वसूली मोर्चाच्या स्वरूपत आंदोलन होत आहे. शेतकऱ्यांचे हीत साधण्यासाठी या आंदोलनात हजारो शेतकरी व नागरिक सामील होणार आहेत. भाजपाचे नागपूर जिल्हा सरचिटणीस उदयसिंह उर्फ गज्जू यादव यांच्यासह आंदोलनासाठी भाजपाचे नागपूर जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे, तालुका अध्यक्ष योगेश वाडीभस्मे, राहुल किरपान, संजय बंटी गुप्ता, कैलास बरबटे, शहर अध्यक्ष विनोद किरपान, उमेश पटले, हरीश बांगळकर, गुरुदेव चकोले प्रयत्न करीत आहेत.