रामटेक – राजु कापसे
रामटेक:- आकाशझेप फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.अरविंद दुनेदार यांना २६ नोव्हेंबरला कामठी येथे समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच आकाशझेप फाऊंडेशनचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांना उत्तम सूत्र संचालन करण्यासाठी गौरविण्यात आले.
संविधानदिनानिमित्त भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी द्वारा भारतीय संविधान आणि लोकशाही वाचविणे समस्त भारतीयांची जबाबदारी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटील, उद्घाटक डॉ. प्रकाश राठोड, प्रमुख पाहुणे डॉ. सर्जनदित्य मनोहर, मुफ्ती अनिक जकी फलाही, सूत्र संचालक साक्षोधन कडबे यांचे हस्ते प्रा. अरविंद दुनेदार यांना भारतीय समाजासाठी उल्लेखनीय निःस्वार्थ सामाजिक सेवेसाठी ‘कर्मवीर दादासाहेब ना. ह. कुंभारे समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले तर साक्षोधन कडबे यांचा उत्तम सूत्र संचालन करण्यासाठी सन्मान करण्यात आला.
आकाशझेप फाऊंडेशन २०१५ पासून विविध क्षेत्रात निरंतर भारतीय समाजाच्या सेवेत असल्याने प्रा. दुनेदार व साक्षोधन कडबे यांचेवर आकाशझेप द्वारा संचालित आम्ही भारतीय परिवार व सर्व सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.