मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुका कार्यकारणाच्या वतीने तहसील कार्यालय मालेगाव येथे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राजधानी दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या मागण्या करता शेतकऱ्यांचा आंदोलन चालू आहे त्यामध्ये 15 आणि 16 ला रेल्वे रोकोची हाक शेतकरी संघटनेने दिलेले आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असून त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन तालुका दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर करण्यात आले व आंदोलन करून तालुका दंडाधिकारी यांना शेतकरी आंदोलनाने ज्या न्याय व संविधानिक मागण्या केलेल्या त्या पूर्ण करण्याकरता वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्र यावेळी तालुका कार्यकारणी वतीने देण्यात आले शेतकऱ्याच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे या नियोजनात म्हटले आहे त्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यासोबत वंचित उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे निवेदन दिले आहे.
या धरणे आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष सारनाथ भाऊ अवचार तालुका महासचिव राजू जमदाडे मालेगाव शहराध्यक्ष अमोल पखाले मालेगाव रिसोड प्रभारी पारितोष इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष मेघाताई डोंगरे वंदनाताई गायकवाड महिला तालुकाध्यक्ष ,बाबाराव मुंडे तालुका युवा आघाडी अध्यक्ष , संदीप पखाले युवा महासचिव,
रामदास वानखेडे तालुका महासचिव, गजानन गवांदे तालुका उपाध्यक्ष, संजय गायकवाड तालुका उपाध्यक्ष, कैलास ढाले तालुका उपाध्यक्ष, बाळासाहेब ढाले तालुका उपाध्यक्ष ,सुनील चंदनशिव जि प सदस्य, वासुदेव कांबळे जउळका सर्कल अध्यक्ष ,बबन पडघान ब्राह्मणवाडा सर्कल अध्यक्ष ,वामन वानखेडे मेडशी सर्कल अध्यक्ष,
भीमराव मैंदकर सर्कल निरीक्षक, रत्नजीत जाधव यांनी किनी राजा सर्कल निरीक्षक हर्षद गवांदे युवा आघाडी गजानन सरकटे युवा आघाडी यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.