शासनाच्या विविध कार्यालयाचे अधिकारी एकाचं ठिकाणी…
नरखेड – अतुल दंडारे
नागरिकांचे विविध कामे विविध शासकीय कार्यालयाशी निगडित असतात. त्यासाठी विविध शासकीय कार्यालयात प्रत्येक कामासाठी त्यांना खेटे घालावे लागतात. परंतु नियोजित काम शासकीय कार्यालयात वेळेवर होईलच याची १०० टक्के हमी कुणीच देऊ शकत नाही.कारण वेगवेगळी कागदपत्रे वेगवेगळ्या कार्यालयातून प्राप्त करावी लागतात.
त्याकरिता नागरिकांचे विविध कामे तसेच शासनाच्या विविध योजनाची प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरिता शासनाच्या विविध कार्यालयाचा एकमेकांशी व नागरिकांशी परस्पर संबंध असणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळ स्तरावर तालुकास्तरिय विविध यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन नागरिकांच्या विविध अडचणी, समस्याचे एकाचं ठिकाणी निराकारण करण्यासाठी ‘प्रशासन आपल्या दारी’ या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदरचे शिबीर दि २१ रोज बुधवारला १०.०० वाजता स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले सभागृह, भोंडेखारी नरखेड संपन्न होणार आहे.या शिबिरात महसूल विभाग,पुरवठा विभाग, ग्राम विकास विभाग,मोजणी विभाग, उपअधीक्षक भूमी अभिलेख, कृषी विभाग, कौशल्य विकास रोजगार उधोंजकता विभाग,आरोग्य विभाग,वन विभाग,सामाजिक वनीकरण विभाग,
महिला व बालविकास विभाग, बँक, सहाय्यक निबंधक, पशुधन विकास विभाग,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, पोलीस विभाग, नगरपालिका,जिल्हा प्रशासन इत्यादी कार्यालयाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या सर्व समस्याचे निराकरण करून विविध योजनेची माहिती देणार आहे.याचा तालुक्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हाण तहसीलदार डी जी जाधव यांनी केले आहे.