हुतात्मा स्तंभास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यातआले
सांगली प्रतिनिधी:–ज्योती मोरे.
जैलाब शेख यांच्या हस्ते हुतात्मा स्तंभास पुष्पहार अर्पण करून शहीद जवान अमर रहे अमर रहे….शहीद जवान अमर रहे अमर रहे…अश्या घोषणा देण्यात आल यावेळी जैलाब शेख म्हणाले की 1857 नंतर 1942 ला भारत स्वतंत्र्यासाठी फार मोठा उठाव झाला,अनेक क्रांतिकारक रस्त्यावर उतरले अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना सडोके की पडो करून सोडले व अनेक ब्रिटिश कार्यालयावर क्रांतीकारकाने तिरंगा ध्वज फडकवला अनेक देशभक्त नऊ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्यासाठी अनेक जण आपल्या प्राण्यांचे आहुती दिली.
अनेकाने तुरुंगवास भोगला यावेळी खास करून इंग्रज सरकारने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना अटक करून तुरुंगात पाठवले… या सर्व क्रांतिकारकांचा व हुतात्म्यांचा व शूरवीर योद्धांन मुळेच आपल्याला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्ती होऊन स्वातंत्र्य मिळालेले आहे.
या सर्व स्वातंत्र सैनिकांनची त्यागाची,बलिदानाची व समर्पणाची आठवण प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये त्यांच्या कार्याच्या ज्वाला कायम आपल्या मनामध्ये तेवत ठेवले पाहिजे असे जैलाब शेख यांनी क्रांती दिनानिमित्त क्रांती हुतात्मा स्तंभास हार अर्पण करताना म्हणाले. यावेळी शिवसेनेचे गुंठेवारी चळवळ समितीचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी, सामाजिक कार्यकर्ते सागर दबडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.